baramati ncp karyakarta
baramati ncp karyakartasaam tv

महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार...शरद पवार...; गाेविंदबागसमाेर NCPचे कडे

आज शरद पवार यांच्या निवासस्थानासमाेर आंदाेलन केले जाणार आहे.
Published on

बारामती : एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांनी आज (मंगळवार) ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या बारामतीतील (baramati) गाेविंदबाग (govindbaug) निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (ncp) हजाराे कार्यकर्ते गाेविंदबाग निवासस्थानजीक जमले असून ते पवार यांच्या नावाचा जयघाेष करीत आहेत. (sharad pawar latest marathi news)

बारामती निरा रस्त्यावर चार ठिकाणी कसून तपासणी केली जात आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. या ठिकाणी काेणीही आंदाेलनास आले तर आम्ही त्यास उत्तर देऊ असे कार्यकर्ते सांगत आहेत.

baramati ncp karyakarta
Satara: ढोल ताशांच्या गजरात; श्रीराम नामाच्या जयघाेषात चाफळात रथोत्सव संपन्न

महाराष्ट्रा बुलुंद आवाज शरद पवार..शरद पवार...सुप्रिया ताई आगे बढाे हम तुम्हारे साथ है अशा घाेषणा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गाेविंदबाग नजीकच्या परिसरात देताहेत. या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी बारामती शहर पाेलिसांनी माेठा बंदाेबस्त तैनात केला आहे. दरम्यान सदावर्ते हे तुरुंगात असल्याने आज येथील आंदाेलन हाेणार नाही अशी शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

baramati ncp karyakarta
FIH Women's Junior World Cup: इंडिया हरली; जर्मनी विरुद्ध नेदरलँड अंतिम लढत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com