सातारा : सातारा (satara) जिल्हयातील तीर्थक्षेत्र चाफळ (chafal) येथील ३७५ वा प्रभू राम (shree ram) यांचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आज पहाटे साडे सहा वाजता रथोत्सवास प्रारंभ झाला. यावेळी चाफळ विभागासह जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून रथोत्सवास साठी भाविकांनी (devotees) हजारोच्या संख्येने अलोट गर्दी केली होती. (chafal ram mandir latest marathi news)
गुलाल खोब-याची उधळण करत श्रीराम नामाच्या गजरात आणि ढोल ताशांच्या गजरात रथ यात्रा गावातून संपन्न झाली. काेराेनाचे संकट दूर झाल्याने या रथ यात्रेत माेठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले हाेते. रामनामाचा जप करीत काही जण बेधुंद नाचत हाेते.
या रथयात्रेची सांगता मंदिरा नजकीच्या रथखाण्याजवळ झाली. रथ यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी मंदिर समितीसह प्रशासनाने काळजी घेतली हाेती.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.