Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : मूळव्याधीचा डॉक्टर करायचा गर्भपात; विनापरवाना सुरू होते तीन वर्षांपासून सिल्लोडचे हॉस्पिटल

Sambhajinagar News : संभाजीनगरच्या गारखेडा परिसरातील एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी साक्षी थोरात आणि तिची आई सविता थोरात या चालवत असलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : गर्भलिंग निदान प्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरातील चर्चेत आलेले श्री हॉस्पिटल मागील ३ वर्षापासून सुरू होते. मात्र या हॉस्पिटलला जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाची परवानगी नसल्याची माहिती आता समोर आली आहे. तरी सुद्धा तीन वर्ष या हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपाताचे प्रकार सुरू होते. विशेष म्हणजे मूळव्याधीचा असलेला डॉक्टर अवैधरित्या गर्भपात करत असल्याचे देखील समोर आले आहे. 

संभाजीनगरच्या (Sambhajinagar) गारखेडा परिसरातील एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी साक्षी थोरात आणि तिची आई सविता थोरात या चालवत असलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश झाल्यानंतर याचे धागेदोरे थेट सिल्लोडमध्ये पोहोचले. पोलिसांनी येथील श्री हॉस्पिटलवर छापा टाकत जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असून या आयुर्वेदिक डॉक्टरसह १० जणांची टोळी ताब्यात घेतली आहे. (Doctor) धक्कादायक माहिती अशी की हॉस्पिटलचा संचालक डॉ. रोशन ठाकरे हा एमबीबीएस असून तो मुळव्याधीवर उपचार करायचा. मात्र काही वर्षापासून अवैधरित्या गर्भपात करण्याचा सपाटा त्याने लावला होता. 

विशेष म्हणजे तीन वर्ष या हॉस्पिटलची कोणतीही चौकशी झाली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या ३ वर्षात शेकडो गर्भपाताच्या कळ्या खुडल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी (Police) हे उघडकीस आणल्यानंतर शहरात चांगलेच धाबे दणाणले आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी काही बाबी उघड होउन मोठें मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Youth Mental Health: डिजिटल डिव्हाईसच्या अतिवापराने तरुणांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का?

Rahul Gandhi : माझ्याकडून मोठी चूक झाली; राहुल गांधी यांनी भर सभेत मान्य केलं, नेमकं काय म्हणाले? VIDEO

पांडवकडा धबधब्यावर तरुण अडकला, मदतीसाठी याचना, कसा वाचला जीव, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: - कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ सिन्नर मध्ये शक्तीप्रदर्शन

Maharashtra Politics : धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार? अजित पवारांनी दिले संकेत

SCROLL FOR NEXT