Gondia Accident : महामार्गावर भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; एकाच जागीच मृत्यू, १५ वर्षीय युवक गंभीर

Gondia News : रायपूरकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने डोंगरगावजवळ त्याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. मागून धडक बसल्याने दोघे जण पुढे फेकले गेले.
Gondia Accident
Gondia AccidentSaam tv

शुभम देशमुख 
गोंदिया
: महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. यात  अपघात गोंदियातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आज सकाळी घडला. या अपघातात भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. 

Gondia Accident
Bribe Case : सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एसीबीच्या ताब्यात; मजुरांचे पैसे काढण्यासाठी मागितली ५ हजारांची लाच

चंद्रशेखर साखरे (वय ४५) असे अपघातात (Accident) मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. चंद्रशेखर साखरे हे मुलाला घेऊन आपल्या दुचाकीने कोहमारावरून देवरीकडे जात होते. या दरम्यान नागपूरकडून (Nagpur) रायपूरकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने डोंगरगावजवळ त्याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. मागून धडक बसल्याने दोघे जण पुढे फेकले गेले. यात दुचाकीस्वार चंद्रशेखर साखरे हे कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला. 

Gondia Accident
RTE Admission : आरटीई प्रवेश प्रक्रियेचा नव्याने मुहूर्त; प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात

जखमी मुलगा रुग्णालयात 

दुचाकीवर मागे बसलेला त्यांचा १५ वर्षीय मुलगा मासूम साखरे हा बाजूला फेकला गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. (Gondia) अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मदतीला आले. यानंतर त्यांनी जखमी मुलास उपच्चारासाठी देवरी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com