Pandharpur Drought : पाणी नसल्याने द्राक्षबाग सुकली; दुष्काळामुळे बाग काढण्याची शेतकऱ्यांवर वेळ

Pandharpur News : राज्यात यंदा दुष्काळाची भीषणता अधिक पाहण्यास मिळत आहे. शेतीसाठी तर सोडा पण पिण्यासाठी देखील पाणी मिळत नसल्याची स्थिती अनेक भागात आहे.
Pandharpur Drought
Pandharpur DroughtSaam tv
Published On

पंढरपूर : दुष्काळाची धग बागायती असलेल्या पंढरपूर तालुक्यातील फळबागांना बसू लागली आहे. पाणी नसल्याने शेतकऱ्याने फळ बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. एक महिन्यापासून पाणी नसल्याने जळून गेलेली द्राक्ष बाग शेतकऱ्याने तोडायला सुरुवात केली आहे. 

Pandharpur Drought
Gondia Accident : महामार्गावर भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; एकाच जागीच मृत्यू, १५ वर्षीय युवक गंभीर

राज्यात यंदा दुष्काळाची भीषणता अधिक पाहण्यास मिळत आहे. शेतीसाठी तर सोडा पण पिण्यासाठी देखील पाणी मिळत नसल्याची स्थिती अनेक भागात आहे. यात (Drought) दुष्काळाचे भीषण सावट आणि पाणी टंचाई सध्या पंढरपूर तालुक्यात शेतकऱ्याचे हाल करताना दिसत आहे. पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील कासेगाव परिसरातील सर्व शेती ही द्राक्ष बागायत शेती आहे. निरा भाटगरच्या कालव्यातून येणाऱ्या पाण्यावर या परिसरातील बहुतांशी शेती अवलंबून आहे. 

Pandharpur Drought
Farmer Rasta Roko : भर उन्हात शेतकऱ्यांचा रास्ता रोको; शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी

मात्र गेल्या दीड महिन्यापासून कालव्याला पाणी नाही. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे द्राक्ष बागांना पाणी कुठून द्यायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर (Farmer) आहे. पनू नसल्याने द्राक्ष बाग उन्हाने जळून खाक झाल्याने द्राक्षबाग पूर्णपणे काढून टाकून घेण्याचा निर्णय आता काही शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com