Dengue Viral Saam tv
महाराष्ट्र

Dengue Viral : डेंग्यू सदृश्य आजाराने मुलीचा मृत्यू; गावात हिवतापाची अनेकांना लागण

Sambhajinagar News डेंग्यू सदृश्य आजाराने मुलीचा मृत्यू; गावात हिवतापाची अनेकांना लागण

Rajesh Sonwane, डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या आपेगाव येथे डेंग्यू सदृश (Dengue) आजाराने नववीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाला. यामुळे आरोग्य विभागाकडून (Health Department) गावात आता तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपेगाव या गावात मोठ्या प्रमाणात हिवतापाचे रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हा, तालुका आरोग्य यंत्रणा आपेगावात दाखल झाली आहेत. या दरम्यान डेंग्यू सदृश्य आजाराने मृत्यू पावलेले वेदिका विजय गडकर (वय १४) ही विद्यार्थिनी आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिकत होती. नेहमीप्रमाणे ती दुपारी शाळेत गेली. शाळेतुन घरी परत आल्यानंतर तीला अचानक ताप आल्याने ती घरी परतली. 

आणखी एका मुलाला लागण 

तिला अस्वस्थ वाटु लागल्याने तिला पैठण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रात्री तिचे निधन झाले. गावातील एक अल्पवयीन युवक तापेच्या आजारांवर पैठण येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्या रक्ताची तपासणी केली असता त्याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने गावकऱ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपलं

Salman Khan : सलमान खान ऐश्वर्या रायच्या प्रेमात होता वेडा, ब्रेकअपनंतर 'तेरे नाम' गाणं ऐकून ढसाढसा रडायचा

महामार्गावर भीषण अपघात! पहाटे वाहन डिव्हायडरला धडकले; ५ जणांचा मृत्यू, १ गंभीर जखमी

Dhantrayodashi Date : यंदा कधी आहे धनत्रयोदशी, १८ की १९ ऑक्टोबर? जाणून घ्या पूजा, मुहूर्त आणि महत्त्व

Heart Attack: धक्कादायक! भारतातील प्रत्येक तिसऱ्या मुलाला हॉर्ट अ‍ॅटॅकचा धोका, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT