Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Sambhajinagar News : संभाजीनगर शहरातील सन्मित्र कॉलनीमध्ये महिलांवर आणि शाळेत जाणाऱ्या लहान मुलांवर २ ते ३ वेळा या मोकाट कुत्र्यांनी घेराव करत हल्ला केल्याची घटना घडली आहे

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढत चालला आहे. दुचाकी धारकांच्या अंगावर जाणे, रस्त्याने पती चालणाऱ्यांवर हल्ला करण्याचे प्रमाण देखील मागील काही दिवसांपासून वाढले आहे. अशीच घटना संभाजीनगर शहरात घडली असून रस्त्याने पायी चालणाऱ्या तरुणीवर ५ ते ६ कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. 

संभाजीनगर (Sambhajinagar) शहरातील सन्मित्र कॉलनीमध्ये महिलांवर आणि शाळेत जाणाऱ्या लहान मुलांवर २ ते ३ वेळा या मोकाट कुत्र्यांनी घेराव करत हल्ला केल्याची घटना घडली आहे. वारंवार तक्रारी करून देखील मनपा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दरम्यान पायी जाणाऱ्या या तरुणीला ६ ते ७ कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक हल्ला करून घेण्याचं दिसत आहे. त्यामुळे तरुणीने आरडा ओरड करून कसातरी आपला जीव वाचवत तेथून पळ काढला. हे दृश्य देखील परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. 

महापालिकेचे दुर्लक्ष 

छत्रपती संभाजीनगर शहरात मोकाट कुत्र्यांचा (Dog Attack) मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. मनपा प्रशासनाने त्यांची नसबंदी करण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले. मात्र या कंपन्या लाखोंचे बिले उचलून देखील मोकाट कुत्र्यांना आळा घालत नसल्याची बाब आता निदर्शनास येत आहे. मात्र मोकाट कुत्र्यांना पकडून शहराबाहेर सोडण्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

Mumbai Metro7A: ट्रॉफिकचं नो टेन्शन; दहिसर ते एअरपोर्ट फक्त ५० मिनिटात पोहोचा, जाणून घ्या Metro 7चा मार्ग, तिकीट दर अन् थांबे

रिक्षाचालकांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Shocking : मुंबईचा तरुण लातुरात आला, लाईव्ह येऊन सगळं सांगितलं; नंतर अचानक आयुष्य संपवलं

Sunday Horoscope : संडे ४ राशींसाठी ठरणार धोक्याचा? जाणून घ्यायचं असेल तर वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT