Today Marathi News : आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात अमित ठाकरे सक्रीय

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (20 june 2024) : दिवसभरातील ताज्या राजकीय घडामोडी अन् पावसाचे अपडेट फक्त एका क्लिकवर. वाचा आजच्या मराठी बातम्या.
राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा
Today's Marathi News Live Saam tv

Mumbai News: ग्रँट रोड परिसरातून 4 बांगलादेशी महिलांना अटक

ग्रँट रोड परिसरातून चार बांगलादेशी महिलांना अटक

अनधिकृतरित्या देशात प्रवेश आणि वास्तव्य केल्याप्रकरणी अटक

डी. बी. मार्ग पोलीस, गावदेवी पोलीस आणि व्ही पी रोड पोलिसांची संयुक्त कारवाई

अवैधरित्या देशात वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधातील विशेष मोहिमेंतर्गत करण्यात आली कारवाई

चौघांची पोलीस कोठडीत रवानगी

Aditya Thackeray: आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात अमित ठाकरे सक्रीय

आदीत्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात अमित ठाकरे सक्रीय

वरळीत आज मनसेची पदाधिकारी बैठक

बैठकीला अमित ठाकरे उपस्थित

वरळीतुन विधानसभेला मनसेकडून संदीप देशपांडे यांच्या नावाची चर्चा

देशपांडे यांच्या संभाव्य उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर वरळी विधानसभेत आज मनसेची पदाधिकारी बैठक

बैठकीत अमित ठाकरे करणार मार्गदर्शन

वरळी विधानसभा विभाग अध्यक्ष ते शाखा सचिव पुरुष महिला व अंगीकृत संघटना यांना अमित ठाकरे करणार मार्गदर्शन

 Arvind Kejariwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, कोर्टाने जामीन केला मंजूर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा

अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

राऊज एवेन्यू कोर्टाने केला जामीन मंजूर

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मिळाला जामीन

कोर्टाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन केला मंजूर

Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी समाज आक्रमक, लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ बंदची हाक

सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी समाज आक्रमक

लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला सांगोला तालुक्यातील ओबीसी समजाचा पाठिंबा

लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ उद्या सांगोला तालुका बंदची हाक....

सोलापूर - सांगली महामार्गावरील नाझरे येथे रास्ता रोको ही केला जाणार....

ओबीसीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन....

Mumbai News: चेंबूरमध्ये क्लीन अप गाडीची दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू  

चेंबूरमध्ये भीषण अपघाताची घटना

दुचाकीस्वाराला क्लीन अपच्या गाडीने चिरडले.

छेडानगर जंक्शनजवळ हा अपघात झाला

अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

जयंतीलाल परमार (वय 53 वर्षे) यांचा अपघातात मृत्यू

जयंतीलाल परमार हे मानपाडा ठाणे येथे जात असताना घडली घटना

क्लीन अप गाडी चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Pune News: पुण्यात स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यात स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल

स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कलम 334, 36 नुसार तरुणांविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांकडून स्टंट करणाऱ्या तरुणांचा शोध सुरू

ससून रुग्णालयाचे डीन पुन्हा एकदा बदलले, डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे सोपवली जबाबदारी

पुणे - ससून रुग्णालयाचे डीन पुन्हा एकदा बदलले

डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडील ससूनच्या डीन पदाचा पदभार शासनाने काढून घेतला

डॉ. एकनाथ पवार ससूनचे नवीन डीन

⁠डॉ. एकनाथ पवार यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाकडून जारी

डॉ. एकनाथ पवार मुंबईतील ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑर्थोपेडिक विभागाचे प्राध्यापक

डॉ. पवार यांना त्यांच्या मुंबईतील प्राध्यापक या मूळ पदाचा पदभार सांभाळून ससूनच्या डीन पदाचा कार्यभार पाहायचा आहे

Nanded News: नांदेडमध्ये आयटीआयचा पेपर बदलला, परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ

नांदेडमध्ये आयटीआयचा पेपर बदलला

चुकीचा पेपर दिल्याने पुन्हा दिला नव्या विषयाचा पेपर

३ तास उत्तरपत्रिका लिहून, पुन्हा दिली नवी प्रश्नपत्रिका

परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ

दोन ते पाच या वेळेत विद्यार्थ्यांनी सोडवली उत्तरपत्रिका

5 वाजता नव्याने देण्यात आली पुन्हा प्रश्नपत्रिका

कंट्रक्शन मटरेल अँड प्रॅक्टिस या विषयाचा पेपर होता

विद्यार्थ्यांच्या हातात दिला इस्टिमॅटिक अँड कॉस्टिक विषयाचा पेपर

पेपर बदलाने परीक्षा केंद्रावर गोंधळ

Ratnagiri News: रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर गॅस टँकर पलटी, वाहतूक ठप्प

रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर दाभोळे येथे गॅस टँकर पलटी

महामार्गावरील वाहतूक ठप्प

महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल

गॅसने भरलेला टँकर कोल्हापूरच्या दिशेने जात होता

या मार्गावरची रत्नागिरीकडे येणारी वाहतूक साखरपा - देवरुख मार्गावरुन वळवण्यात आली

तर कोल्हापूरला जाणारी वाहतूक पाली येथे थांबवण्यात आली

Nagpur News: नागपूर हिट अँड रन प्रकरण, उचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू

नागपूरच्या दिघोरी हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट

उपचार सुरू असलेल्या चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

आतापर्यंत दिघोरी नाक्याजवळील हिट अँड रन प्रकरणामध्ये ३ जणांचा मृत्यू झालाय

सोमवारी रात्री मद्यधुंद कारचालकाने रस्त्याच्या कडेला फुटपाथच्या शेजारी झोपलेल्या ९ जणांना चिरडले होते

या अपघातामध्ये आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला

याप्रकरणी पोलिसांनी चालकासह ६ जणांना अटक केलीये

Kolhapur News : कोल्हापुरातील तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी बंद

कोल्हापुरातील तिलारी घाट ३१ ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन

घाटातील रस्ते जीर्ण आणि नादुरुस्त असल्याने घाट अवजड वाहतुकीला बंद करण्यात आलाय.

Sharad Pawar : जमीन विकू नका, शरद पवार यांचा शेतकऱ्यांना सल्ला

शरद पवार यांचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. काही करा जामीन विकू नका. पुणेकर मुंबईकर येतील, पण जमीन तर आपली आहे. काही ना काही मार्ग निघतो. तुम्ही काही काळजी करू नका. कोणी एजंट गावात येत असेल, तर त्याला गावात येऊ देऊ नका, असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar News : शरद पवार उद्या आठ खासदारांची बैठक घेणार

शरद पवार उद्या नवनिर्वाचित आठही खासदारांची बैठक घेणार आहेत. पुण्यातील निसर्ग कार्यालयामध्ये बैठक होणार आहे. निसर्ग कार्यालयात दुपारी तीन वाजता शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आठ खासदार यांची बैठक होईल. शरद पवार बैठकीत खासदारांना काय मार्गदर्शन करणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Pune News : पुण्यात भाजप कार्यकर्ते आपापसात भिडले

पुण्यात भाजप कार्यकर्ते आपापसात भिडल्याची घटना घडली आहे. पुण्यातील शंकर महाराज मठातील ही घटना आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आज सकाळी दर्शनासाठी येण्याआधी ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. भाजपकडून मात्र असा वाद झाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे

PM Narendra modi : पंतप्रधान मोदी पेपर लीक का थांबवत नाही? राहुल गांधींचा सवाल

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

आम्ही भारत जोडो न्याय यात्रेत मणिपूरवरून महाराष्ट्रात गेलो. अनेक विद्यार्थ्यांनी पेपर लीक होत असल्याची तक्रार दिली होती. नीट आणि नेट परीक्षेचे पेपर लीक झाले आहेत. मोदींनी रशिया युक्रेन युद्ध, इस्राएल गाजा युद्ध थांबवलं होत म्हणत होते. मग मग पेपर लीक मोदी का थांबवत नाही ? त्यांना थांबवायचं नाही का ? असा सवाल राहुल गांधी यांनी केला.

Pune : पुण्यातून महाडला जाणाऱ्या मार्गावरील घाटात कड्याचा भाग कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही

पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाटात वाघजाईदेवी मंदिराजवळ असणाऱ्या उंच कड्याचा काही भाग कोसळून रस्त्यावर कोसळ्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला असलेला संरक्षक कठडा तुटला आहे. सुदैवाने यावेळी रस्त्यावर कोणतेही वाहन नसल्याने अनर्थ टळला आहे.

दरीच्या बाजूला असलेल्या संरक्षक कठड्याच्या भिंतींच्या भागासह, मुख्य रस्त्याचा काही कोसळल्यानं रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. रात्रीच्या अंधारात, धुके असताना याठिकाणी रस्त्याचा अंदाज न आल्यास अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरडीमुळे रस्त्यावर पडलेले दगड बाजूला करुन वाहनचालकांना दिसेल असे सुचनादर्शक फलक अथवा  पाठरा रंग दिलेले दगड लावण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येते आहे.

Panvel News : पनवेलमधील डोंगरावर अडकलेल्या तरुण-तरुणींना केलं रेस्क्यू

पनवेलमधील आदई गावाजवळील डोंगरात धबधब्यार गेलेल्या 9 जणांना पनवेल पोलिसांनी रेस्क्यू केले.यात 8 मुली आणि 1 मुलाचा समावेश होता. नजर चुकवून मुले डोंगरावर गेली होती. त्यानंतर खाली उतरण्यासाठी प्रयत्न करत होते. उतरत असताना सर्व मुले डोंगराच्यामध्येच अडकली. त्यानंतर पोलीस,आणि अग्निशमन दलाचे अधिकारी वेळेवर पोहचल्याने वाचले युवकांचे जीव वाचले.

नवी मुंबईत मुसळधार पाऊस, सखल भागात रस्ते जलमय

नवी मुबंईत पावसामुळे काही सखल भागातील रस्ते जलमय झाले आहेत.

वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले.

रस्ता जलमय झाल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Mumbai Rain : मुंबईतील दहिसरमध्ये ४० वर्ष जुने झाडं कोसळलं, दुचाकी आणि कार झाडाखाली दबल्या

मुंबईतील दहिसर पूर्व येथील आर.एम .एस हाउसिंग सोसायटी परिसरात दुपारी 12 वाजता 40 वर्ष जुने पिंपळाचे मोठे झाड कोसळले. या झाडाखाली 3 बाईक आणि 3 कार दबल्या गेल्या. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे.

Kolhapur Rain Update : कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, जिल्ह्यात ऑरेंज अलर्टही जारी

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम घाट माथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.

Kalyan Dombivli Rain : कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून मुसळधार पाऊस

कल्याण डोंबिवली सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नालेसफाईचे पोल खोल सुरु आहे. कल्याण पूर्वेकडील पीसवली गावातील श्री कॉलनी ज्योतिर्लिंग कॉलनी धनश्री कॉलनी जलमय झाली आहे. नाला चुकीच्या पद्धतीने बांधल्याने पाणी साचल्याचा नागरिकांचा आरोप आहे. यावरून नागरिकांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना घेराव घातला आहे.

Pune News : पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन, जोरदार घोषणाबाजी

पुण्यात अभाविपच आंदोलन सुरु आहे. पुण्यातील कात्रज कोंढवा रोडवर असलेल्या AIMS इन्स्टिट्युटमध्ये झालेल्या भ्रष्टचार विरोधात आंदोलन सुरु आहे. भ्रष्टाचाराची चौकशी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. AIMS इन्स्टिट्युटच्या गेटसमोर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. इन्स्टिट्युट विरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थीनी इन्स्टिट्यूटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.

Beed News : बीडच्या अंबाजोगाईत ओबीसी आंदोलक आक्रमक; महामार्गावर टायर जाळून आडवला रस्ता

जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे सुरू असणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाची धग आता बीडमध्येही हळूहळू पसरत आहे.

बीडच्या अंबाजोगाई शहरात ओबीसी बांधव आक्रमक झाले

अंबाजोगाई - परळी महामार्गावर टायर जाळून रस्ता अडवण्यात आला आहे.

अंबाजोगाई शहरातील संत भगवान बाबा चौकामध्ये ओबीसी आंदोलकांनी टायर जाळून आंदोलन केलं

महामार्गावर टायर जाळल्याने वाहतूक कोंडी झाली आहे..

Nitish Kumar News  : नितीश कुमार सरकारला दणका, हायकोर्टाकडून 65 टक्के आरक्षणाचा निर्णय रद्द

पटना हायकोर्टाने नितीश कुमार सरकारला दणका दिला आहे.

एससी एसटी ओबीसींना 65 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हायकोर्टाने रद्द केला आहे.

नितीश कुमार सरकारने घेतलेला निर्णय पटना हायकोर्टाने रद्द केला आहे.

त्यामुळे नितीश कुमार सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

NEET Exam :  नीट घोटाळा प्रकरण : परीक्षा रद्द झाल्यास काउन्सिलिंग फेरी आपोआप रद्द होईल - सुप्रीम कोर्ट

NEET परीक्षेतील घोटाळ्याबाबत आज गुरुवारी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात काउन्सिलिंग बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.

कोर्टाने आज गुरुवारी पुन्हा एकदा त्यावर बंदी घालण्यास नकार दिला.

परीक्षा रद्द झाल्यास काउन्सिलिंग आपोआप रद्द होईल, असे कोर्टाने म्हटलं आहे. आज कोर्टात आठ नवीन याचिका दाखल झाल्या होत्या.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून उद्या डिस्चार्ज मिळणार

मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून उद्या डिस्चार्ज मिळणार आहे. त्यानंतर

अंतरवाली सराटी गावात उद्या दर्शन घेऊन जरांगे पाटील दौरा सुरू करणार आहेत.

तिर्थक्षेत्र चाकरवाडी येथे मनोज जरांगे यांचा दौरा असणार आहे. त्यांना सकाळी आठ वाजता डिस्चार्ज मिळणार आहे.

Maharashtra Politics : विधानपरिषदेला एका जागेसाठी काँग्रेस मुस्लिम चेहरा देण्याची शक्यता

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून मुस्लिम चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे.

वजाहाद मिर्झा आणि नसीम खान यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

नसीम खान यांना लोकसभेत उमेदवारी न मिळाल्यानं वाद झाला होता.

आता काँग्रेसच्या कोट्यातून एक उमेदवार विधानपरिषदेवर जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ashadhi wari 2024 : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडा,काँग्रेसची मागणी

विठ्ठलाची वारी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. नांदेडसह आजूबाजूच्या जिल्ह्यातून पंढरीतील विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असते. या पार्श्वभूमीवर नांदेडवरून विशेष रेल्वे गाड्याचं आयोजन करण्यात यावं, अशी मागणी काँग्रेसने दक्षिण मध्य रेल्वे प्रबंधक नीती सरकार यांच्याकडे केली आहे.

Sharad Pawar Tour :  शरद पवारांचा दुष्काळ दौरा, बारामतीला पोहोचले

शरद पवार यांचा दुष्काळ दौरा सुरु आहे. शरद पवार यांच्या दुष्काळ दौऱ्याच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. आज पवार बारामतीमधील पणधरे गावात पोहोचले आहेत. दौऱ्यात शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, रशिया वरून आलेला पिटर सुद्धा उपस्थितीत आहेत.

Pune News: पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक, चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंदोलन

शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती. त्या गोष्टीची अंमलबजावणी व्हावी. सरकारला जाग यावी यासाठी राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

Laxman Hake Hunger Strike: प्रकाश आंबेडकर जालन्यात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची घेतली भेट

Summary

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी या उपोषणस्थळी भेट दिली. सरकारने या उपोषणाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.

IIT Mumbai News: आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना लाखोंचा दंड; कारण काय?

आयआयटी मुंबईच्या आठ विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला आहे. संस्थेच्या वार्षिक कला मोहत्सवात रमायाणावर आधारित नाटकात मुख्य पत्राला अपमानित पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप या विद्यार्थ्यांवर करण्यात आला होता. काही विद्यार्थ्यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पदवीचं शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला १.२० लाख रुपयांचा दंड तर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Amravati Breaking: अमरावतीचे शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या पत्नीचं निधन 

Summary

शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या पत्नी मंगला आनंदराव अडसूळ यांचं मुंबई येथील निवस्थानी आज सकाळी 7 वाजता अल्पशा आजाराने निधन झालंय. त्यांच्यावर मुबई येथे अंत्यसासकर करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा आज सायंकाळी 4 वाजता मुबई येथील कदमगिरी, अशोक नगर, कांदिवली पूर्व या निवस्थावरून निघणार आहे.

Navi Mumbai Rain: नवी मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात, चाकरमान्यांची तारांबळ

नवी मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झालीय. मागील अनेक दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने आज जोरदार बॅटिंग केलीय. जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सकाळी कामाला निघालेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली.

Kolhapur Breaking: हातकणंगले तालुक्यात डेंगूच्या रुग्णांमध्ये वाढ, ग्रामीण रुग्णालयात रूग्णांची गर्दी

हातकणंगले तालुक्यातील आळते गावात डेंगूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. 100 पेक्षा अधिक डेंगू सदृश्य रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गावातील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी झालीय.

Jalna Breaking: उपोषणाचा आजचा आठवा दिवस, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंची प्रकृती खालावली

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सकाळी 10 वाजता उपोषणकर्त्यांची भेट घेणार आहे. तर राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवार हे देखील दुपारी दोन वाजता उपोषणकर्त्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालवली आहे. जिल्हाधिकारी आणि डॉक्टरांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली आहे. मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

UGC NET: यूजीसी नेट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी संतप्त

यूजीसी नेट रद्द झाल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षेची मागणी केली आहे. सायबर गुन्ह्याच्या शक्यतेमुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यूजीसी नेट परीक्षा रद्द केली. विद्यार्थ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षेची मागणी त्यांनी केली आहे. देशातील ३१७ शहरात ११ लाख २१ हजार विद्यार्थ्यांनी यूजीसी नेट ची परीक्षा दिली होती.

Nashik News: ठाकरे गटाच्या पदाधिकाराऱ्याच्या गाडीवर हल्ला, नाशिकमध्ये खळबळ 

नाशिकमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला झालाय. अज्ञात लोकांनी रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभे असलेल्या गाडीवर केला हल्ला. मोठ्या दगडाने गाडीची काच फोडली. बाळा कोकणे शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक मध्य विधानसभा अध्यक्ष आहेत. दोन वर्षांपूर्वी देखील कोकणे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.

UGC NET Exam : UGC NET परीक्षा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

UGC NET परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 18 जूनला यूजीसी नेट परीक्षेचा पेपर झाला होता. परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणाचा सीबीआयकडून तपास केला जाणार आहे. नीटच्या परीक्षेत झालेल्या गोंधळानंतर केंद्र सरकारचा सावध पवित्रा आहे. जुन सत्रातील UGC NET परीक्षा पुन्हा होणार आहे. परीक्षेचं पावित्र्य राखण्यासाठी परीक्षा पुन्हा घेत असल्याच केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय.

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय जम्मू आणि कश्मीर दौऱ्यावर, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय जम्मू आणि कश्मीर दौऱ्यावर आहेत. २१ जून (उद्या) होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमात मोदी सहभागी होणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगर इथं ‘एम्पावरिंग यूथ, ट्रांसफॉर्मिंग जम्मू आणि कश्मीर’ कार्यक्रमात भाग घेणार आहेत. त्याचबरोबर मोदी 1 हजार 500 कोटी रूपयांच्या कामाचे उद्घाटन आणि भूमीपूजन करणार आहेत. मागच्या काही दिवसांपासून सतत काश्मीर खोऱ्यात होत असलेले हल्ले आणि त्यानंतर होत असलेला मोदींचा दौरा त्यामुळं सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

Nagpur News:  नागपूरात 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात,  मोठ्या संख्येने तरूणांचा सहभाग

नागपूरात 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा प्रचंड उत्साहात साजरा होत आहे. नागपुरातील महाल परिसरतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा सोहळा पार पडत आहे. ढोल ताश्याचा गजरात शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फ़े या सोहळ्याचं आयोजन केले आहे. मोठ्या संख्यने छत्रपती शिवाजी महाराज हा सोहळा साजरा होताना तरुणांनी मोठ्या संख्यने सहभाग घेतला.

Accident News: सिन्नर शिर्डी महामार्गावर पिकअपचा भीषण अपघात;  २ महिला मजुरांचा मृत्यू,२० जखमी

सिन्नर शिर्डी महामार्गावर वावीजवळ पिकअप गाडीचा अपघात झाला आहे. पिकअप गाडी उलटून झालेल्या अपघातात २ महिला मजुरांचा मृत्यू तर २० जण जखमी झाले आहेत. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे. सिन्नर शिर्डी महामार्गाची सफाई, गवत काढणे या कामाचं कंत्राट घेतलेल्या कंपनीसाठी मजूर महिला काम करत होत्या. संध्याकाळी ठेकेदाराच्या गाडीतून कामावरुन परतत असताना अपघात झाला.

Palghar Breaking: मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका, विरार लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने

पालघरमध्ये मुसळधार बरसणाऱ्या पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका बसला आहे. डहाणू विरार लोकल सेवा 25 ते 30 मिनिटे उशिराने आहे . ठिकठिकाणी ट्रॅक जवळ पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंतची लोकल सेवा धीम्या गतीने सुरू आहे . जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.