छत्रपती संभाजीनगर येथील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी विचित्र अपघात झाला. एकाच वेळी तीन वाहनांची जोरदार धडक झाली. आडगाव जावळे शिवारात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ई-बस, आयशर आणि ट्रक यांच्यात तिहेरी अपघात झाला. या अपघातात एसटी बसमधील १० प्रवासी किरकोळ जखमी झाले.जखमींवर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
प्रत्यक्षदर्शींनुसार, छत्रपती संभाजीनगरहून बीडच्या दिशेने जाणाऱ्या ई-बस आणि आयशर यांच्या समोर एका ट्रकने अचानक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यामुळे आयशर आणि ई-बसने तातडीने ब्रेक मारले. परंतु अति वेग असल्यामुळे एकमेकांवर धडक झाली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. स्थानिकांनी रस्त्यावरील अरुंद भाग आणि ओव्हरटेकिंगच्या समस्यांवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. जखमींच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.