Buldhana : ट्रक आणि कारचा भयंकर अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, चौघे गंभीर जखमी

Nandura accident News : महामार्ग क्रमांक ६ वर नांदुरा जवळ आर्टिका कार आणि ट्रकचा भीषण अपघात, तीन ठार तर चार गंभीर जखमी. बचाव कार्य दोन तास सुरू होते.
Buldhana  Nandura accident News
Buldhana Nandura NH6 Accident: 3 Dead, 4 Injured in Car-Truck Collision
Published On

संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी

Maharashtra highway crash, car truck collision : बुलढाण्यामध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात झालाय. महामार्ग क्रमांक ६ वर नांदुरा जवळ आर्टिका कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भयंकर होता की महामार्गावर बचाव कार्य दोन तास सुरू होते. पोलिसांनी घटनास्थळावर तात्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघातामधील जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल केले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नांदुरा शहराजवळ आज सकाळी कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की, आर्टिका कार पूर्णपणे चक्काचूर झाली. जखमी आणि मृतांना कारमधून बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला दोन तासांहून अधिक काळ प्रयत्न करावे लागले.

Buldhana  Nandura accident News
Maharashtra Weather : मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMDचा अंदाज काय सांगतो?

प्रत्यक्षदर्शींनुसार, ट्रक आणि कार यांच्यात समोरासमोर जोरात धडक झाली. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. जखमींना तातडीने खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

Buldhana  Nandura accident News
11th Admission Process: अकरावीत प्रवेश घ्यायचा कसा, कॉलेज निवडायचे कसे? किचकट प्रक्रिया सोप्या भाषेत

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com