Sambhaji Bhide on national flag  Saam tv
महाराष्ट्र

Sambhaji Bhide : देशाचा राष्ट्रध्वज भगवा झाला पाहिजे; संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

Sambhaji Bhide on national flag : संभाजी भिडे यांनी भारताच्या राष्ट्रध्वजावर मोठं भाष्य केलं. कोल्हापुरात धारकऱ्यांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापूर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संभाजी भिडे यांनी राष्ट्रध्वजावर भाष्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. देशाच्या शीर्षस्थानी भगवा झेंडा आला पाहिजे, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. ते कोल्हापुरातील एका आंदोलनादरम्यान बोलत होते.

संभाजी भिडे यांच्या भाषणातील मुद्दे

देशात महायज्ञ सुरू आहे, तो विझू देता कामा नये. या महायज्ञाची सांगता ही या देशाच्या शीर्षस्थानी भगवा झेंडा आला पाहिजे अशी करायची आहे.

शिवछत्रपती गेले प्रचंड नैराश्य आले. आता पुढे काय? असे प्रश्न आलेत. संभाजी महाराज छत्रपती झाले. केवळ पावणे नऊ वर्षांचं असताना छत्रपती म्हणून काम आपल्या वडिलांना शोभेल असं केलं.

वडिलांच्या तोडीस तोड कर्तृत्व गाजवलं. त्यानंतर अतिक्रूर मरण त्यांच्या वाट्याला आले. संभाजी महाराज यांची जी हत्या झाली, त्या औरंग्याने केली. सगळ्या प्रश्नांना उत्तर हिरोजी फर्जंद, तो शिवछत्रपतींचा भाऊ होता. तो सगळ्यांना म्हणाला, शिवाजी महाराजांची आठवण करा. आपण रायगडला जाऊयात महाराज शेवटी ज्या जागेवर होते तिथे जाऊयात. हे सर्व त्या जागेवर जाऊन बसलेत.

महाराजांच्या सर्व आठवणीतून धारकरी मराठा मंडळी उठली आहे. महाराष्ट्रातील धारकऱ्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर उभे आडवे 3200 किलोमीटर लांब 3200 किलोमीटर आडवे राज्य केलं.

सारा देश पादाक्रांत केला दिल्लीच मुघलाच तख्त तोडलं. तुकडे केले आणि मराठ्यांनी लाल किल्ल्यावर 1784 ते 1803 भगवा फडकवून १९ वर्ष हिंदवी स्वराज्याचे राज्य केलं. याची पुनरावृत्ती म्हणजेच हिंदुस्तानचा झेंडा तिरंगा नाही. हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवा आहे. तो परत लाल किल्ल्यावर फडकवण्याच्या कामानेच आजच्या उपोषणाची समाप्ती होणार आहे.

डोळ्यांसमोर छत्रपती संभाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्या कामाची तीव्रता ही सूर्याच्या तेज्यासारखी असून ती मावळणार नाही. आत्ता स्वातंत्र्य आहे. परंतु आम्हाला चंद्र हवा. एका माऊलीने रामाच्या हातात आरसा दिला आणि हातातील आरशात चंद्र पाहून राम थंड झाला, तर असं होता कामा नये. काशीचा विश्वेश्वर पुन्हा निर्माण करून पाकिस्तानचा नायनाट करायचा आहे. हे स्वातंत्र्य भगव्या झेंड्याचे उत्पन्न करणारे उपोषण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT