Political News : राजकारणात खळबळ! आणखी एका बड्या घराण्यात फूट, मुलगा करणार नव्या पक्षाची घोषणा

Bihar Political News : बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ झाली आहे. बिहारमधील लालू प्रसाद यांच्या कुटुंबात फूट पडली आहे. लालू प्रसाद यांचा मोठा मुलगा नव्या पक्षाची घोषणा करणार आहे.
Bihar Political
Bihar Political NewsSaam tv
Published On

बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेज प्रताप यादव नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे. तेज प्रताप यादव पत्रकार परिषद घेऊन नव्या पक्षाची घोषणा करतील. तेज प्रताप यांचे वडील लालू प्रसाद यांनी त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन केलं आहे. त्याचबरोबर त्यांना कुटुंबातूनही बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Bihar Political
Bhiwandi Bogus Doctor : भिवंडीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; महापालिकेकडून ५ जणांवर कारवाई

बिहार विधानसभा निवडणुका याच वर्षी होणार आहे. तेज प्रताप यादव सध्या हसनपूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहे. त्यांनी याआधी २०१५ ते २०२० या वर्षात महुआ विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. काही महिन्यांपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी मुलगा तेज प्रताप यादव यांचं पक्षातून निलंबन केलं होतं. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच आता तेज प्रताप यादव यांनी कुटुंबाच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

Bihar Political
Devendra Fadnavis : विधीमंडळातून लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर...; देवेंद्र फडणवीसांकडून मोठी भीती व्यक्त

तेज प्रताप यादव यांचं नाव अनुष्का यादव यांच्याशी जोडलं गेलं. एकीकडे तेज प्रताप यादव आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाचं प्रकरण कोर्टात सुरु आहे. दुसरीकडे तेज प्रताप यादव यांनी काही दिवसांपूर्वी अनुष्का यादव यांच्याशी असलेलं छुपं नातं सार्वजनिक केलं. यानंतर लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन केलं. तसेच त्यांनी कुटुंबातूनही बाहेर काढलं. यामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

Bihar Political
Pune News : पुण्यात दरोड्याचा थरार; कुख्यात टोळीची शहरात शस्त्रांसहित एन्ट्री, क्षणात पोलिसांनी डाव उधळला, घटना सीसीटीव्हीत कैद

तेज प्रताप यांच्यावर करण्यात आलेली कारवाईची माहिती स्वत: लालू यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली होती. खासगी जीवनातील नैतिक मुल्यांची प्रतारणा केल्याने सामाजिक न्यासाठीचा सामाजिक संघर्ष कमकुवत होतो, असे लालू यादव यांनी म्हटलं होतं. दरम्यान, अनुष्का यादव देखील तेज प्रताप यादव यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com