
फैय्याज शेख, साम टीव्ही
भिवंडी शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. भिवंडी महापालिकेच्या आरोग्य विभागाने भिवंडीत ५ बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे. या बोगस डॉक्टरांनी झोपडपट्टी विभागात दुकान थाटलं होतं. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. या सर्व बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल पुढील कारवाईला सुरुवात करण्यात आली हे.
भिवंडी शहरातील झोपडपट्टी विभागात मोठ्या प्रमाणावर बोगस डॉक्टर दुकान थाटून बसले आहेत. त्यातच महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मातामृत्यू आणि बालमृत्यू वाढल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे हे मृत्यूदर नियंत्रणात ठेवण्यासाठी दृष्टीकोनातून आयुक्त तथा प्रशासक अनमोल सागर यांच्या निर्देशानुसार महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे नोडल ऑफिसर डॉ.जयवंत धुळे,प्र.शहर क्षयरोग अधिकारी डॉ.बुशरा एजाज सय्यद,वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रिया फडके,डॉ. रूकय्या कुरेशी यांनी पोलिस पथकासह वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकला.
पालिकेच्या पथकाच्या कारवाईत पाच अनधिकृतपणे दवाखाने थाटून बसलेल्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये डॉ.शबनम सिद्दीकी या न्यू आझाद नगरमधील आयशा मल्टीस्पेशालिस्ट क्लिनिक नावाने दवाखाना अवैधपणे चालवत असल्याचे समोर आले आहे. याचप्रमाणे गायत्री नगरमधील बौद्ध विहार येथील मरियम केअर क्लिनिक नावाने डॉ. इरम अताउल्लाह शेख यांचा अनधिकृतपणे दवाखाना सुरू होता.
भिवंडी परिसरातच डॉ. रिजवान अन्सारी,डॉ.गुलशन शेख आणि डॉ. राजन चौरसिया अशी कारवाई केलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. भिवंडीतील बोगस डॉक्टरांचे वेगवेगळे दवाखाने सिल करण्याची कारवाईही वैद्यकीय पथकाने केली आहे. तर बोगस डॉक्टरांच्या विरोधात गुन्हे दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.