Samarjeet Ghatge Saam Digital
महाराष्ट्र

Samarjeet Ghatge : विधानसभेआधी महायुतीला पहिला धक्का दिलेले समरजित घाटगे नक्की कोण आहेत? छत्रपतींच्या घराण्याशी काय आहे संबध?

Sandeep Gawade

कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या कागल मतदारसंघातून मंत्री हसन मुश्रीफ सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तब्बल 18 वर्षाहून अधिक काळ वेगवेगळी मंत्रिपदं भूषवलेल्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या मुश्रीफांना यावेळी मात्र आव्हान दिलंय ते समरजित घाटगे यांनी. गेल्यावेळीही समरजित घाटगे निवडणुकाला सामोरे गेलं होते, मात्र यावेळी राजकारण काहीसं वेगळं आहे आणि त्याला पवारांची साथ आहे. पाहूयात समरजित घाटगे यांचा राजकीय प्रवास आणि छत्रपती घराण्याशी नेमका संबंध काय आहे.

घाटगे घराणे हे कागल तालुक्यातील राजघराणे आहे यांच्याच घराण्यामध्ये राजर्षी शाहू छत्रपती यांचा जन्म झालेला आहे त्यामुळे छत्रपती घराण्याचे मूळ जनक घराणे म्हणून घाटगे घराण्याकडे पाहिलं जातं. समरजित घाटगे हे पेशाने CA आहेत मात्र वडील विक्रमसिंह घाटगे यांच्या आकसमित निधनाने शाहू सहकारी साखर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. पर्यायाने ते राजकारणात देखील आले. याच दरम्यान समरजीत घाटगे यांनी 2019 पूर्वी भाजपमध्ये थेट प्रवेश करून पक्षाचे काम सुरू केलं.

भाजप जिल्हाध्यक्ष पदासह पुणे म्हाडाचे अध्यक्ष म्हणून देखील घाटगे यांनी काम पाहिल होत. २०१९ च्या निवडणुकीत भाजप शिवसेना युतीमुळे एन निवडणुकीच्या तोंडावर जागांची अदलाबदली झाली नाही. परिणामी समरजीत घाटगे यांनी मुश्रीफ यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. पहिल्यांदाच अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या घाटगे यांनी 90 हजाराहून अधिक मतं मिळवत सर्वांचे लक्ष वेधलं. 2019 च्या पराभवानंतर पुन्हा कामाला लागलेल्या समरजीत घाटगे यांनी बदल हवा तर आमदार नवा म्हणत मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

Mumbai local train update : मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य आणि ट्रान्स हार्बरवर विशेष पॉवर ब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, वाचा वेळापत्रक

Maharashtra Assembly Elections: ठाकरे - शरद पवार गटात जागावाटपावरून तिढा? 20 जागांवर अडकली मविआची गाडी? मुंबईतल्या बैठकीत काय झाली चर्चा?

SCROLL FOR NEXT