krishnaraaj mahadik Saam tv
महाराष्ट्र

Krishnaraaj Mahadik : आर्चीसोबत लग्न करणार का? कृष्णराज महाडिकांनी खरं खरं सांगून टाकलं

Krishnaraaj Mahadik Latest News : कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरूचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चांव कृष्णराज महाडिकांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Vishal Gangurde

'सैराट' फेम रिंकू राजगुरू आणि खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघांचा एकत्र फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कोल्हापुरातील श्री महालक्ष्मीच्या मंदिराबाहेरील फोटो व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर लग्नाची चर्चा सुरु झाल्यानंतर धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्यात तसं काही नाही, तसं काही समज करून घेऊ नका,असं कृष्णराज महाडिक यांनी स्पष्ट केले.

कृष्णराज महाडिक यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली. त्यावेळी कृष्णराज यांनी लग्नाच्या चर्चावर भाष्य केलं. कृष्णराज महाडिक म्हणाले, 'आम्ही ठरवूनच भेटलो होतो. फोटोचा वेगळा अर्थ काढला जातो. माझ्या रिसेंट ब्लॉगमध्ये लग्नाची चर्चा झाली होती. मी फक्त एवढीच रिक्वेस्ट करतो की, तसं काही समज करून घेऊ नका'.

२०२५ मध्ये यंदा कर्तव्य असल्याच्या वडिलांच्या वक्तव्यावर बोलताना कृष्णराज म्हणाले, 'मोठे भाऊ लग्न झालं. त्यामुळे तिसऱ्यावर प्रेशर असतो. घरात मग चालूच असतं. व्लॉग आहे. आमची मजा मस्ती चालते. वडील बोलून गेले. तो सुद्धा बातमीचा विषय झाला. लग्न कधी होणार, काय होणार हे मला पण माहीत नसतं. स्वयंवर ठेवणार आहे. मला भरपूर कॉल येतात. तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की, अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका'.

कोण आहेत कृष्णराज महाडिक?

कोल्हापुरातील भाजप खासदार धनंजय महाडिक यांना ३ मुले आहेत. पृथ्वीराज आणि विश्वराज हे त्यांच्या दोन मुलांची नावे आहेत. कृष्णराज हे त्यांच्या तिसऱ्या मुलाचे नाव आहे. कृष्णराज हे एक युट्यूबर आहेत. krish Mahadik असे त्यांच्या युट्यूब चॅनलचं नाव असून कोल्हापूरांमध्ये प्रसिद्ध आहेत. कृष्णराज हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT