sadabhau khot, satara, police, pune banglore national highway saam tv
महाराष्ट्र

Pune Bangalore Highway Traffic Update: पुणे-बंगळूर महामार्गावर पाेलिसांनी सदाभाऊंपुढे जाेडले हात, 'रयत' चालतच राहिली; वाहतूक मंदावली

Rayat Kranti Sanghatana Rasta Roko Aandolan: रयत क्रांतीचा आज साता-यात हाेणार महत्त्वपूर्ण निर्णय.

ओंकार कदम

Satara News : रयत क्रांती संघटनेच्या वतीने सदाभाऊ खोत (sadabhau khot latest marathi news) यांच्या नेतृत्वाखाला "वारी शेतकऱ्यांची" पदयात्रा आज (गुरुवार) सातारा पाेलीसांनी (satara police) पुणे बंगळूर महामार्गावर (pune bangalore highway) अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस दल आणि सदाभाऊ खोत यांच्यात थाेड्याफार प्रमाणात बाचाबाची झाली. दरम्यान रयत क्रांतीच्या माेर्चामुळे सातारहून पुण्याला जाणारी एनएच 4 वरील वाहतुक धिम्या गतीने सुरु हाेती. (Maharashtra News)

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने 22 मे पासून कराड ते सातारा यादरम्यान वारी शेतकऱ्यांची ही पदयात्रा काढण्यात येत आहे. आमच्या मागण्यांवर आणि प्रश्नांवर राज्य शासनाने निर्णय न घेतल्यास ही वारी मुंबई पर्यंत काढणार असल्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला हाेता.

या वारीचा आज चौथा दिवस असून सातारा पोलीस प्रशासनाने खाेत यांची पुणे बंगळूर महामार्गावर जाऊन भेट घेत पदयात्रा थांबविण्याची विनंती केली. परंतु खाेत यांनी आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी भूमिका घेतली. दरम्यान या माेर्चामुळे महामार्गावरील वाहतुक धिम्या गतीने सुरु हाेती. आज दुपारी सातारा येथे सभा घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल अशी माहिती खाेत यांनी माध्यमांना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीतील पहिलीच मंत्रिमंडळ बैठक; बारामतीसह पुणे जिल्ह्यासाठी घेतले ३ महत्त्वाचे निर्णय

अजितदादांच्या घातपाताचा संशय; विमान दुर्घटना, टाइमलाइन, चॅटिंग, पायलट ते सर्व व्हिडिओ अन् शंकांचं काहूर माजवणारे सवाल

Ranveer Singh Receives Threat: रोहित शेट्टीनंतर रणवीर सिंगला मिळाली जीवे मारण्याची धमकी; बॉलिवूडमध्ये भीतीचं वातावरण

Pune Tourism : हिरव्यागार निसर्गाने नटलेले 'मुळशी'; वीकेंडला करा पुण्याचा प्लान, 'ही' २ ठिकाणे पाहायला विसरू नका

Maharashtra Live News Update: नवापूर हायवेवर अपघाताचा थरार, ट्रक आणि कारची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT