Sangli Crime News : ट्रॅक्टर अंगावर घालून मुलानं बापाला जिवानीशी मारलं; गाव हळहळलं

पाेलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास सुरु केला आहे.
Sangli, Mijaj, Bedag, Sangli Crime News, Police
Sangli, Mijaj, Bedag, Sangli Crime News, Policesaam tv

Sangli Crime News : उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या बापाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून मुलाने खून केल्याची घटना सांगली (sangli) जिल्ह्यात आज (बुधवार) घडली आहे. पाेलीस (police) या घटनेचा कसून तपास करीत आहेत. (Maharashtra News)

Sangli, Mijaj, Bedag, Sangli Crime News, Police
Unseasonal Rain News : सातारा, साेलापूरला पावसानं झाेडपलं; काेल्हापूरात मंडप काेसळला, पाहूणे मंडळी जखमी

ही घटना सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील बेडग या गावात आज (बुधवार) घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेतील संशयित आरोपी हा घटनेनंतर फरार झाला आहे. पोलीस त्याचा तपास करीत आहेत.

Sangli, Mijaj, Bedag, Sangli Crime News, Police
Saam Tv Exclusive : काेकणातील हापूस की कर्नाटकी ? आंबा खरेदीपुर्वी असं ओळखा (पाहा व्हिडिओ)

घटनास्थळावरुन आणि पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार लक्ष्मण आकळे याने वडिलांकडून 80 हजार रुपये उसने घेतले होते. ते आज वडील दादू आकळे हे मागण्यासाठी गेले हाेते. त्यावेळी लक्ष्मण याने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला.

Sangli, Mijaj, Bedag, Sangli Crime News, Police
Krushi Utpanna Bazar Samiti News : सभापती निवडी बिनविराेध; अकलूजला सलग चाैथ्यांदा मदनसिंह, मंगळवेढ्यात आवताडे, येवल्यात धनगेंची वर्णी

ही घटना समजल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळावर पाेहचले. पाेलीसांनी अधिक चाैकशी केली असता त्यांना मुलगा लक्ष्मण आकळे याने हा प्रकार केल्याची काही लाेकांनी सांगितले. त्यानंतर ताे घटनास्थळावरून पळून गेला. मिरज ग्रामीण पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com