
- अजय साेनवणे / भारत नागणे
Krushi Utpanna Bazar Samiti Chairman Election News : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीची प्रक्रिया अजून सुरु आहे. राज्यातील येवला, मंगळवेढा तसेच अकलूज बाजार समितीच्या पदाधिका-यांची निवडी बिनविराेध झाल्या आहेत. (Maharashtra News)
येवल्यात धनगे, गायकवाडांची वर्णी
नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (yeola krushi utpanna bazar samiti) सभापतीपदी अनपेक्षितपणे राष्ट्रवादीचे किसनराव धनगे तर उपसभापतीपदी शिवसेना ठाकरे गट नेते संभाजी पवार यांचे निकटवर्तीय बापू गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज झालेल्या विशेष सभेत सभापती पदासाठी किसनराव धनगे व उपसभापतीपदी बापू गायकवाड यांचे एकमेव अर्ज आले. त्यामुळे दाेघांचा बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. आमदार छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने १३ जागा जिंकत बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व राखले होते.
साेलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (mangalvedha krushi utpanna bazar samiti) सभापतिपदी भाजपचे सुशील बबनराव आवताडे यांची तर उपसभापतिपदी नानासो राजाराम चोपडे यांची निवड झाली आहे. या दाेन्ही निवडी बिनविरोध झाल्या आहेत. या निवडी नंतर आवताडे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.
साेलापूर जिल्ह्यातील अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (akluj krushi utpanna bazar samiti) सभापतिपदी मदनसिंह मोहिते-पाटील तसेच उपसभापतिपदी बापूराव पांढरे यांची बिनविरोध निवड झाली. मदनसिंह यांची सलग चौथ्यांदा बाजार समितीच्या सभापतिपदी तसेच पांढरे यांची दुसऱ्यांदा उपसभापतिपदी निवड झाली आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.