Coriander, Pune Mandai
Coriander, Pune Mandaisaam tv

Pune Mandai News : पुण्यात पालेभाज्यांचे दर कडाडले, सामान्यांचं बजट गडबडलं, कोथिंबिरीचा भाव गगनाला... (पाहा व्हिडिओ)

वाढत्या महागाईमुळे नागरिकांना आर्थिक ताण साेसावा लागत आहे.

- अक्षय बडवे / प्राची कुलकर्णी

Pune News : काही दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस आणि आता वातावरणात झालेला उच्चांकित तापमान याचा फटका पालेभाज्यांवर दिसू लागला आहे. कोथिंबीरसह पालेभाज्यांचे दरात माेठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चाट बसू लागली आहे. (Maharashtra News)

Coriander, Pune Mandai
Karjat Krushi Utpanna Bazar Samiti News : राम शिंदे-रोहित पवारांमध्ये मोठी चुरस: दोन्ही गटाला समान जागा; कर्जत बाजार समितीसाठी फेर मतमोजणी सुरू

काही दिवसांपुर्वी पुण्यातील मंडईत कोथिंबीरीची (Coriander Price Hike In Pune Mandai) गड्डी दहा रुपयांना मिळत होती. परंतु गेल्या दाेन ते तीन दिवसांपासून कोथिंबीरीचा दर थेट 30 ते 40 रुपयांपर्यंत पोहचला आहे. या बराेबरच मंडईत पालेभाज्यांना मागणी असली तरी त्याचेही दर वाढल्याने सामान्य नागरिकांवर आर्थिक बाेजा पडू लागला आहे.

Coriander, Pune Mandai
Udayanraje Bhosale News : तुम्हांला वठणीवर आणायला वेळ लागणार नाही : उदयनराजे भाेसले

याबराेबच गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी झाल्यामुळे परिणामी मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, पालक, पुदिन्याच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे आधीच महागाईची झळ सोसत असलेल्या सामान्यांना आता भाजी खरेदी करणे पण कठीण जातं आहे.

Coriander, Pune Mandai
Gautami Patil Viral Video : एकाला पप्पी..., गौतमीच्या चाहत्यांना दांडक्याचा प्रसाद (पाहा व्हिडिओ)

दरम्यान पुण्यातील मार्केट यार्डात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, पालक, पुदिन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींच्या बजेटवर काही प्रमाणात ताण येणार असल्याचे दिसून येत आहे. घाऊक बाजारात मेथीच्या शेकडा जुडीमागे २०० रुपये, कांदापातीच्या शेकडा जुडीमागे २०० रुपये, चाकवत, पुदिन्याच्या शेकडा जुडीमागे १०० रुपये, पालकाच्या शेकडा जुडीमागे ३०० रुपयांनी वाढ झाल्याची माहिती मार्केट यार्डातील तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.

रविवारी तरकारी विभागात कोथिंबिरेच्या सव्वालाख जुडी आणि मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. किरकोळ बाजारात पालेभाज्यांचे जुडीचे दर २० ते ३० रुपयांपर्यंत आहेत. तर अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com