Gautami Patil Viral Video : एकाला पप्पी..., गौतमीच्या चाहत्यांना दांडक्याचा प्रसाद (पाहा व्हिडिओ)

gautami patil viral video : गाैतमी पाटीलच्या चाहत्यांनी तिच्या कलेला दाद दिली.
Gautami Patil, Video Viral, Sangli
Gautami Patil, Video Viral, Sanglisaam tv

Sangli News : सांगली जिल्ह्यात प्रसिद्ध नृत्यागंणा गौतमी पाटील (gautami patil latest marathi news) हिच्या कार्यक्रमात काही हुल्लडबाजांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. त्याचे व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल (viral video in social media) हाेऊ लागले आहेत. (Maharashtra News)

Gautami Patil, Video Viral, Sangli
Karjat Krushi Utpanna Bazar Samiti News : राम शिंदे-रोहित पवारांमध्ये मोठी चुरस: दोन्ही गटाला समान जागा; कर्जत बाजार समितीसाठी फेर मतमोजणी सुरू

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कळंबी येथे काही दिवसांपुर्वी सबसे कातील गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी चांगलाच धुमाकूळ घातला हाेता. सुरुवातीला काही गाणी झाल्यानंतर काही हुल्लडबाज तरुणांनी गोंधळ घातल्यानंतर युवकांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला हाेता. त्यानंतर पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यात गाैतमी पाटील हिचा कार्यक्रम तासगाव तालुक्यातील वायफळे गावी झाला.

Gautami Patil, Video Viral, Sangli
Ajit Pawar News : ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, हे विसरू नका! अजित पवारांनी काेणाला दिला दम (पाहा व्हिडिओ)

मूळचे वायफळे येथील परंतु बिहार येथे सोने चांदी व्यवसायच्या निमित्ताने स्थायिक झालेल्या एका दाम्पत्याने त्यांच्या लग्नाचा 25 व्या वर्षानिमित्त गौतमी पाटीलचा गावात कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्या गौतमीच्या चाहत्यांना पोलिसांकडून लाठीचा प्रसाद देण्यात आला. या कार्यक्रमासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच खाजगी सुरक्षा रक्षक ही या कार्यक्रमात तैनात होते. मात्र जसं जसा कार्यक्रम रंगत गेला तसतसं गौतमीच्या चाहत्यांची हुल्लडबाजी सुरु झाली.

दरम्यान कायदा व सुववस्था बिघडू नये यासाठी अखेरीस हुल्लडबाजांना पाेलीसांनी लाठीचा प्रसाद दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com