रत्नागिरी गावठी बॉम्बच्या स्फोटाने हादरली
१३ वर्षीय मुलगा स्फोटात गंभीर जखमी
खेड तालुक्यात गावठी बॉम्बचा स्फोट
शिकारीसाठी वापरला जाणारा बॉम्ब हातात फुटला
रत्नागिरी जिल्हा पुन्हा गावठी बॉम्बच्या स्फोटामुळे हादरला. रत्नागिरी जिल्ह्यात गावठी बॉम्ब स्फोटाच्या मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच गावठी बॉम्बच्या स्फोटामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच खेड तालुक्यातील मुरडे गाठलवाडीमध्ये गावठी बॉम्बच्या स्फोटामध्ये १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे शिकारीसाठी वापरला जाणारा गावठी बॉम्ब हातात फुटल्याने मुलगा गंभीर जखमी झाला. प्रणव प्रताप येसरे (वय १३ वर्षे) असं जखमी मुलाचे नाव आहे. प्रणव गुरे राखण्यासाठी मुरडे गोठलवाडी परिसरात गेला होता. त्यावेळी त्याला शिकारीसाठी वापरला जाणारा गावठी बॉम्ब दिसला. उत्सुकतेपोटी त्याने तो हाात घेतला आणि स्फोट झाला.
हा स्फोट इतका भीषण होता की प्रणवच्या हाताला, छातीला तसेच डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या स्फोटानंतर तो रक्तबंबाळ झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्रणव येसरेला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला सांगली येथे हलविण्यात आले आहे.
प्रणवची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. फॉरेन्सिक लॅबचे पथक आणि बॉम्बशोधक पथकाकडून सखोल तपास सुरू आहे. परिसरात आणखी स्फोटके लपवून ठेवण्यात आली आहेत का याचा देखील शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे सध्या रत्नागिरीत भीतीचे वातावरण आहे. शिकारीसाठी अशाप्रकारची धोकादायक स्फोटकं कुठून आली याचा तपास केला जात आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.