Ramdas Athawale Saam tv
महाराष्ट्र

Ramdas Athawale: रामदास आठवलेंचा आरपीआय पक्षही विधानसभेच्या मैदानात! महायुतीकडे केली 'इतक्या' जागांची मागणी

Ramdas Athawale RPI On Assembly Election: आरपीआय त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवेल आणि विदर्भात उत्तर नागपूर, उमरेड (नागपूर), यवतमाळमधील उमरखेड आणि वाशीमसह तीन ते चार जागा मागणार आहे, असं ते म्हणाले.

Gangappa Pujari

Maharashtra Assembly Election 2024: या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे विधानसभेच्या जागा वाटपावरुन महायुतीमधील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपमध्येच अनेक जागांवरुन तिढा पाहायला मिळत आहे. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही जागांची मागणी केली आहे.

सत्ताधारी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच आरपीआय पक्षाला आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत किमान 10 ते 12 जागा लढवण्याची संधी मिळावी, असे रामदास आठवले यांनी रविवारी सांगितले. नागपुरात पत्रकार परिषदेला संबोधित करताना रामदास आठवले यांनी याबाबत महत्वाचे विधान केले आहे. आरपीआय त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवेल आणि विदर्भात उत्तर नागपूर, उमरेड (नागपूर), यवतमाळमधील उमरखेड आणि वाशीमसह तीन ते चार जागा मागणार आहे, असं ते म्हणाले.

आरपीआयने 18 संभाव्य जागांची यादी तयार केली आहे, जी काही दिवसांत महायुतीच्या घटक पक्षांसमोर सादर केली जाईल आणि जागा वाटपाच्या चर्चेत किमान 10 ते 12 जागा मिळतील अशी अपेक्षा आहे, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यातून प्रत्येकी चार जागा आपल्या पक्षाला द्याव्यात, अशी मोठी मागणी रामदास आठवले यांनी केली.

दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महायुतीचाच भाग आहे, ज्यामध्ये भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये त्यांच्या पक्षालाही मंत्रीपद मिळायला हवे, अशी मागणी केली होती. याशिवाय आगामी निवडणुकीत राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी सत्ताधारी महायुती आघाडी 150-160 जागा जिंकेल, असा दावा रामदास आठवले यांनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT