संजय महाजन, साम टीव्ही प्रतिनिधी
जळगाव : एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ खडसे यांनी शनिवारी शरद पवार गटाच्या मंचावरून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली होती. खडसेंच्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'मी बोलायचं म्हटलं तर पळता भुई थोडी होईल, असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर तुफान हल्लाबोल केला. गिरीश महाजन म्हणाले,'मी एवढ्या मोठ्या नेत्याची लाचारी पहिल्यांदा राजकारणात बघत आहे. ते म्हणतात मी त्यांना विनंती केली, प्रवेशही झाला. फोटोही काढले. पण ते मला घेतच नाही, एवढी लाचारी मी आजपर्यंत बघितली नाही. मला एकनाथ खडसेंची आता कीव यायला लागली आहे. 'पोरीची निवडणूक आल्यावर तिचं काम करायचं. सूनेची निवडणूक आली की तिचं काम करायचं, असं पारोळ्याचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी त्यांना चांगलं सुनावलं आहे'.
'खडसेंची किती कमाल आहे. दुसरीकडे कोणी नको, सगळ्या ठिकाणी आम्हीच पाहिजे. ही त्यांची भूमिका आहे. हे लोकांना कळायला लागलं आहे. त्यांनी कितीही अश्लील आणि काहीही बडबड केली, तरी माझ्या मतदारसंघांमध्ये माझा जनतेचा विश्वास माझ्यावर आहे. एवढ्या वर्षांमध्ये तुमची दोन रुग्ण मुंबईला घेऊन जायची बोंब पडली का? केवळ पद भोगायची बडबड करायची, एवढेच कामात त्यांच्याकडे राहिलेलं आहे, असे ते म्हणाले.
'धडाधड धडाडीचे पडताहेत. त्याच्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्याच्यामुळे ते वाह्यात सारखं काही बोलत आहे. बोलण्या सारखं तर माझ्याकडे सुद्धा खूप आहे. मी बोलायचं म्हटलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल. एक वेळ त्यावेळेस मी नक्की बोलेल, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी खडसेंना इशारा दिला.
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरूनही मंत्री गिरीश महाजन यांनी टोला लगावला. 'राज्यपाल असले म्हणून सर्वाधिकार काय महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना दिले का? त्यांच्यावर मोठे गुन्हे दाखल आहेत. मोठ्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक झालेली आहे. त्यामुळे त्यांची बडबड राहणारच आहे, त्यांच्याकडून अपेक्षा काय आहे, असा सवाल करत महाजन यांनी टोला लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.