Nitin Gadkari : सत्ता कोणीचीही असो, रामदास आठवलेंना मंत्रिपदाची गॅरंटी; नितीन गडकरींच्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला, VIDEO

Nitin Gadkari on Ramdas athawale : नागपुरात नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर मिश्किल भाष्य केलं. आठवलेंवरील गडकरींच्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला.
सत्ता कोणीचीही असो, रामदास आठवलेंना मंत्रिपदाची गॅरंटी; नितीन गडकरींच्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला, VIDEO
Nitin Gadkari on Ramdas athawale Saam tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

नागूपर : 'आम्हाला चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही, मात्र रामदास आठवलेंना आहे. सरकार कोणाचे आले तरी रामदास आठवले यांचे मंत्रीपद पक्के असते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गंमतीने म्हणाले. नितीन गडकरी यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. ते नागपुरातील एका कार्यक्रमात बोलत होते.

नागपुरात मारवाडी फाऊंडेशनर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. सिव्हील लाईन येथील चिटणवीस सेंटरच्या बॅनियन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

सत्ता कोणीचीही असो, रामदास आठवलेंना मंत्रिपदाची गॅरंटी; नितीन गडकरींच्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला, VIDEO
Nitin Gadkari: १९०० कोटींच्या रस्त्यासाठी ८००० कोटींची वसुली का? नितीन गडकरी सांगितलं कारण

नितीन गडकरी पुढे म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीत आमचे सरकार येऊन त्यांना मंत्री होण्याची गॅरंटी आहे. मात्र आम्हाला मात्र नाही आहे. मी गंमतीने नेहमीच म्हणत असतो. राज्य कोणाचे आले तरी रामदास आठवले यांचे स्थान पक्के आहे. त्यावेळी लालूप्रसाद यादव हे रामविलास पासवान यांना म्हणाले होते की, रामदास आठवले हे राजकीय मौसमी शास्त्रज्ञ आहेत. राजकारणात पुढे काय होणार आहे, याची सर्व माहिती आठवलेंना असते, असा किस्सा त्यांनी सांगितला.

सत्ता कोणीचीही असो, रामदास आठवलेंना मंत्रिपदाची गॅरंटी; नितीन गडकरींच्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला, VIDEO
Ramdas Athawale: 'उद्धव ठाकरे- फडणवीस वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मीच' : रामदास आठवले

अन् आठवले झाले तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री

काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बाजी मारली. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३०० जागा जिंकल्या होत्या. तर संयुक्त पुरोगामी आघाडीनेही चांगल्या जिंकल्या. लोकसभेत ३०० जागा मिळाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्तेवर दावा ठोकला. त्यानंतर झालेल्या शपथविधीत नरेंद्र मोदी यांच्यासहित नितील गडकरी, रामदास आठवले यांनीही केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com