पुण्यातील खराब रस्त्यावरून गडकरी भडकले, महायुती सरकारला पाठवली नोटीस; काय दिला इशारा?
Nitin Gadkari On Pune Road PotholesSaam Tv

Pune Road Potholes: पुणे पालिकेची काढली लाज, रस्त्यावरील खड्ड्यांवरून लक्तरं वेशीला; नितीन गडकरी यांची राज्य सरकारला नोटीस

Nitin Gadkari On Pune Road Potholes: पुण्यातील रस्त्यांवरच्या खड्ड्यामुळे पुणेकरांना रोजचाच त्रास सहन करावा लागतोय. मात्र या खड्ड्यांमुळे पुणे महापालिकेची लक्तरं वेशीवर टांगली गेली आहेत. कारण थेट राष्ट्रपतींनीच पुणे महापालिकेला नाराजीचं पत्र पाठवलंय.
Published on

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते.. हा अनुभव सर्वसामान्यांना रोजचाच. याच खड्ड्यांच्या रस्त्यामुळे अपघातात अनेकांचा जीव जातो. मात्र पुण्यातल्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा थेट देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनाही मोठा फटका बसलाय. मुर्मूना पुणे दौऱ्या खड्ड्यांचा मोठा त्रास झाला.

त्यामुळे राष्ट्रपती भवनानं पुणे महापालिकेला पत्र लिहून नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे पालिकेची लक्तरं वेशीला टांगली गेली आहेत. हे कमी होतं की काय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी पुण्यातल्या जाहीर कार्यक्रमात मुंबई-पुणे, नगर-कल्याण रस्त्यावरून राज्य सरकारचे चांगलेच वाभाडे काढलेत.

पुण्यातील खराब रस्त्यावरून गडकरी भडकले, महायुती सरकारला पाठवली नोटीस; काय दिला इशारा?
NCP Symbol Case: राष्ट्रवादीचं घड्याळ जाणार? 'अजित पवारांना नवं चिन्ह द्या', शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सुप्रीम कोर्टात याचिका

या रस्त्यांवर टोल वसुली राज्य सरकारची आणि शिव्या मी खातो, असं म्हणत गडकरींनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केलाय. एवढंच नव्हे तर रस्ते दुरूस्त केले नाहीत तर रस्ते ताब्यात घेईन, अशी तंबीच त्यांनी राज्य सरकारला दिलीय.

पुण्यातील खराब रस्त्यावरून गडकरी भडकले, महायुती सरकारला पाठवली नोटीस; काय दिला इशारा?
Dharavi Special Story : धारावीत लोक रस्त्यावर का उतरले, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

आता 26 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर येणार असल्याने पुणे पोलिसांनी शहरातील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेला पत्र लिहीलंय. तर गडकरींनीही महायुती सरकारला इशारा दिलाय. त्यामुळे राज्य सरकार रस्त्यांवरचे खड्डे बुजवणार की गडकरींवर रस्ते ताब्यात घेण्याची नामुष्की ओढावणार? याची उत्सुकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com