Farmers stage a protest at Vita Tehsil office in Sangli against the Shaktipeeth Highway project as Raju Shetti addresses the gathering. saam tv
महाराष्ट्र

... तर मुख्यमंत्र्यांचा ताफा आडवू, सभेत घुसून जाब विचारू, पश्चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा CM फडणवीसांना इशारा

Raju Shetti Warning To Devendra Fadnavis Over Shaktipeeth Highway: सांगलीत शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश वाढला असून, राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

शक्तिपीठ महामार्गावरून दिवसागणिक वातावरण चांगलेच तापत चालले आहे. या सगळ्याच्या विरोधात आज विटा तहसील कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. खासदार राजू शेट्टी ही देखील या मोर्चामध्ये उपस्थित होते. विटा तहसील कार्यालयामध्ये जाऊन मोर्चेकरांनी ठिय्या मांडला. पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय असा सवाल राजू शेट्टी यांनी प्रांतधिकाऱ्यांना केला. यानंतर प्रांताधिकारी विक्रम सिंह बादल, उपविभागीत अधिकारी विपुल पाटील, तहसीलदार योगेश टोणपे यांनी मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारले.

पहाटे 2 वाजता ड्रोन सर्वेक्षन

आज सांगली जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गासाठी आज पुन्हा पहाटेपासून पोलीस बंदोबस्तामध्ये ड्रोन मोजणीचा प्रयत्न झाला आहे. मात्र शेतकऱ्याचा विरोध कायम असल्याच दिसून येत आहे. काल ड्रोन मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर आज पहाटेपासून विटा जवळील नागेवाडी भागात ड्रोन मोजणीचा प्रयत्न झाला. मात्र दुसऱ्या दिवशीही स्थानिक शेतकऱ्यांचा ड्रोन मोजणीला विरोध कायम आहे. यासंबंधी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत पोलिसांवर हल्लाबोल केला.

शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर सुरू असलेली दडपशाही थांबवावी अन्यथा सांगली-कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या गाड्या आडवू, सभेत घुसून जाब विचारू,असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी ड्रोन सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे, दोन्ही सर्वेक्षण थांबवा आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी थेट विटा तहसील कार्यालयावर धडक दिली.

यावेळी प्रशासनाच्या राजू शेट्टी यांनी अधिसूचना नसताना रोज सर्वेक्षण कशासाठी केला जातो असा सवाल करत सांगली-कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा गाड्या अडवून, त्यांच्या सभेत घुसून मुख्यमंत्र्यांना जाब विचारू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजू शेट्टी यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT