raju shetti demands inquiry of sangli dcc bank  Saam Digital
महाराष्ट्र

Sangli Dcc Bank : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमा; अचानक राजू शेट्टींनी सरकारला का केली अशी मागणी? Video

Raju Shetti Aggresive On Sangli Dcc Bank Administration : राजू शेट्टींच्या या मागणीवर सहकारमंत्री काेणता निर्णय घेणार याकडे सांगलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

विजय पाटील

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळा प्रकरणी जिल्हा बँकेवर प्रशासक नेमा अन्यथा भ्रष्टाचार प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी रस्त्यावर उतरू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे. शेट्टी यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन सरकारकडे नुकतेच पाठविले आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहा शाखांमध्ये दोन कोटी 43 लाखांचा दुष्काळ आणि अवकाळी निधीवर डल्ला मारण्याचा प्रकार शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याचा समोर आला. या घोटाळाप्रकरणी बँकेने सात जणांना निलंबित केले आहे. तसेच बॅंकेने विविध शाखांची तपासणी देखील केली.

या प्रकरणानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेट्टी यांनी बँकेवर प्रशासक नेमावा, बँकेची सखोल चौकशी व्हावी याबाबतच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: विदर्भात काँग्रेसची ताकद वाढली, माजी आमदारासह अनेक बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश

Sarva Pitru Amavasya 2025: सर्व पितृ अमावस्येला या ४ ठिकाणी लावा दिवा, लक्ष्मी अन् पितर दोन्ही होतील प्रसन्न

Maharashtra Live News Update: नांदेडच्या मुखेड शहरात भीषण अपघात, 7 ते 8 जण गंभीर

Shocking : पत्नीला अंघोळ करताना तरुणाने पाहिलं, व्हिडीओ बनवून पती विषारी औषध प्यायला अन् पुढे...

बस झालं ना दादा... अजित पवारांसामोरच धनंजय मुंडे संतापले | VIDEO

SCROLL FOR NEXT