Pune : बुधवार पेठेत पोलिसांची पुन्हा अचानक छापेमारी, ४ महिलांची सुटका, भोपसिंगला ठोकल्या बेड्या

Budhwar Peth Pune red light area news : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांनी पुन्हा छापेमारी करत वेश्या व्यवसायातून ४ बांगलादेशी महिलांची सुटका केली.
Pune Faraskhana police budhwar peth news
Pune Police Update newsSaam TV
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune Police Raid Budhwar Peth : पुणे पोलिसांनी पुन्हा बुधवार पेठेत वेश्या व्यवसायावर अचानक छापेमारी केली. पुणे पोलिसांनी ४ बांगलादेशी महिलांची सुटका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांकडून बुधवार पेठेत (Budhwar Peth) छापेमारी करत महिलांची सुटका कऱण्यात येत आहे. पुणे पोलिसांकडून मानवी तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे. पुणे पोलिसांनी बांगलादेशी एजंटासह ४ जणांवर गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे. (Pune Crime: Faraskhana Police Conduct Surprise Raid in Budhwar Peth, Free Trafficked Women Lured with Job Offers)

पुण्यातील बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर फरासखाना पोलिसांनी अचानक छापा टाकला. पुणे पोलिसांनी छापा टाकून चार बांगलादेशी महिलांची सुटका केली. नोकरीच्या आमिषाने भारतात आणून त्यांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.

Pune Faraskhana police budhwar peth news
Gas Cylinders : दरवाढीचा भडका उडाला! घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ, वाचा ताजे दर

गुरुवारी रात्री जनता बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर वेश्या व्यवसायावर छापा टाकला.यावेळी घरात चार बांगलादेशी महिला आढळून आल्या. बांगलादेशी एजंट मुल्ला, तसेच बाबू भैया उर्फ पापा शेख (रा. बुधवार पेठ), भोपसिंग राजपूत (रा. जनता बिल्डिंग, बुधवार पेठ) आणि इमारत मालक मिनाक्षी रमेश मेत्री (रा. बुधवार पेठ) या चौघांविरुध्द अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Pune Faraskhana police budhwar peth news
नको तेच झालं! युद्धाच्या झळा भारताच्या दारात, पुण्यात सिलिंडरच्या नव्या ऑर्डर घेणं थांबवलं

आरोपी भोपसिंग राजपूत याला अटक केली असून,इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. नोकरीचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकलले आरोपींनी या बांगलादेशी महिलांना ब्युटी पार्लर किंवा शिवणकामाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून भारतात आणले. त्यानंतर त्यांना धमकावून आणि पैशांचे प्रलोभन दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. महिलांना एका खोलीत ठेवून त्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांवर आरोपी उदरनिर्वाह करत असल्याचे तपासात समोर आले.

Pune Faraskhana police budhwar peth news
भयंकर! बायकोनं नवऱ्याच्या मदतीने भरदिवसा प्रियकराची केली हत्या, सपासप वार करताचा व्हिडिओ समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com