भयंकर! बायकोनं नवऱ्याच्या मदतीने भरदिवसा प्रियकराची केली हत्या, सपासप वार करताचा व्हिडिओ समोर

Nagpur crime news today : नागपूरच्या खापरखेडा परिसरात प्रेम त्रिकोणातून भरदिवसा थरारक हत्या घडली. पत्नी आणि तिच्या पतीने मिळून जुन्या प्रियकरावर चाकूने सपासप वार करत हत्या केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
Nagpur crime news today
Nagpur crime news todayCrime news
Published On

पराघ ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

उपराजधानी नागपूर भरदिवसा हत्येच्या घटनेनं हादरले. बायकोनं नवऱ्याच्या मदतीने प्रियकराची चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार घडला. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून कसून केला जात आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचा शोध पोलिसांकडून केला जात आहे.

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार घडला. या घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बायको अन् नवरा चाकूने सपासप वार करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. खापरखेडा परिसरातील कोराडी रोडवर पती पत्नीकडून पत्नीच्या जुन्या प्रियकराची धारदार चाकूने हत्या करण्यात आली. या घटनेचा थरारक व्हिडिओ पाहून पायाखालची जमीन सरकेल.

Nagpur crime news today
IAF Sukhoi Su-30MKI : मोठी बातमी! भारताचे सुखोई विमान क्रॅश, उड्डाण घेताच 60 किमीवर अग्नितांडव

सागर वानखेडे असे मृतकाचे नाव आहे. तर आरोपी पत्नी सोनाली गजभिये आणि पती राजू गजभिये यांना पोलिसांनी अटक केली. सोनाली आणि सागरचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र सोनालीने राजू गजभिये हिच्याशी लग्न केले. तिला दोन मुले आहेत.पण सोनाली आणि सागर लग्नानंतरही संपर्कात होते. राजु गजभिये यांनी खापरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. सागर होळीनिमित्त पुण्याहून गावी आला होता. या दरम्यान त्याने सोनालीला इंस्टाग्रामवर भेटण्यासाठी मॅसेज केला..

Nagpur crime news today
Pune : अध्यात्मिक शिक्षणाच्या नावावर विद्यार्थिनीचं शारीरिक शोषण, आळंदीच्या आश्रमातील धक्कादायक प्रकार

सकाळी दहा वाजेदरम्यान सागर आणि सोनाली एकाच बाईकवरून गेले होते. सोनालीने रस्त्यात मुद्दाम तिची पर्स खाली टाकली. सागरने बाईक थांबताच सोनालीने सोबत नेलेल्या चाकूने दोन वार केले. त्यानंतर राजू गजभिये पाठलाग करत तिथे पोहचला त्यानेही सागरवर अनेक वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सागरचा जागीच मृत्यू झाला.आरोपी पती - पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Nagpur crime news today
Jishnu Dev Varma : मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची निुयक्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com