Dhule News : आदिवासी संघटना एकवटल्या, 'त्या' घटनेच्या निषेर्धात उद्या पिंपळनेर बंदची हाक

Pimpalner Bandh Tommorow : पिंपळनेर येथील महिलेवर झालेल्या घटनेचा निषेध करीत नराधमांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे.
adivasi samaj calls for a bandh in pimpalner tommorrow
adivasi samaj calls for a bandh in pimpalner tommorrow Saam Digital
Published On

आदिवासी महिलेवर झालेल्या अतिप्रसंगाच्या घटनेनंतर आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेच्या निषेर्धात सर्व आदिवासी संघटनांनी उद्या (बुधवार) पिंपळनेर बंदची हाक दिली आहे. या बंद नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या परिसरात आदिवासी महिलेवर दोघा नराधमांनी अतिप्रसंग केला. या घटनेनंतर आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

adivasi samaj calls for a bandh in pimpalner tommorrow
Saam Impact: 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर नवी मुंबई महापालिका प्रशासन ताळ्यावर, आठवडाभरात नालेसफाईचे काम पूर्ण हाेणार, Video

सर्व आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी आज पिंपळनेर येथे या घटनेच्या निषेधार्थ बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान सर्व आदिवासी संघटनांनी उद्या (बुधवार) घटनेचा निषेध करण्यासाठी पिंपळनेर बंदची हाक दिली आहे. त्यामुळे उद्या सकाळपासून सर्वच दुकाने व आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

adivasi samaj calls for a bandh in pimpalner tommorrow
Pimpri Chinchwad : बनावट कागदपत्रांसह 5 बांगलादेशींना अटक, पिंपरी चिंचवड दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com