Pimpri Chinchwad : बनावट कागदपत्रांसह 5 बांगलादेशींना अटक, पिंपरी चिंचवड दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई

Anti Terrorism Squad Arrests 5 Bangladeshi Nationals : या संशयित आराेपींना बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या इतर दोघांवर पाेलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
anti terrorism squad arrests 5 bangladeshi citizens in pimpri chinchwad
anti terrorism squad arrests 5 bangladeshi citizens in pimpri chinchwadSaam Digital

पिंपरी चिंचवड दहशतवादी विरोधी पथकाने बनावट कागदपत्रासह पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे पाचही जण भारत देशात बेकायदेशीर रित्या राहत हाेते. ही कारवाई भोसरी भागातील शांतीनगर परिसरात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शमीम नुरोल राणा, राज उर्फ सम्राट सदन अधिकारी, जलील नरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार, वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीऊल हक हिरा, आझाद शमशुल शेख उर्फ अबुल कलाम शमशुद्दिन फकीर अशी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांचे नाव आहे.

anti terrorism squad arrests 5 bangladeshi citizens in pimpri chinchwad
पाण्याचे दुर्भिक्ष! उपक्रमशील शेतीतून मिळविले भरघोस उत्पन्न; वाचा नांदेड, परभणीच्या शेतक-यांची Success Story

हे संशयित आरोपी भारतात बनावट आधार कार्ड, जन्माचा दाखला व शाळा सोडल्याचा दाखला ,पासपोर्ट बनवून राहत होते. दहशत विरोधी पथकाला याची माहिती मिळताच छापा टाकून पाचही नागरिकांना अटक केल्याचे पाेलिसांनी सांगितले.

पोलिसांनी संशयितांकडून सिम कार्ड, 11 हजार रुपये किमतीचा मोबाईल, एअरटेल कंपनीचे सिम आदी साहित्य जप्त केले. त्यांच्यावर परकीय नागरिक कायदा पारपत्र अधिनियम व भारतात प्रवेश करण्याचा नियम यानुसार गुन्हे दाखल केले आहेत

Edited By : Siddharth Latkar

anti terrorism squad arrests 5 bangladeshi citizens in pimpri chinchwad
Nandurbar: उष्माघाताने हजाराे कोंबड्यांचा मृत्यू, नंदुरबारचे पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com