Hatkanangale Lok Sabha Election: भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षाने राजू शेट्टींचा प्रचार केला? महायुतीच्या नेत्यांकडून हकालपट्टीची मागणी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि अन्य घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करून काम केल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.
mahayuti leaders demands resignation of nishikant bhosale patil who helps raju shetti in election
mahayuti leaders demands resignation of nishikant bhosale patil who helps raju shetti in electionSaam Digital

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांनी प्रचार केल्याचा आराेप हाेऊ लागला आहे. यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांची पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजप आणि महायुतीच्या नेत्यांकडून हाेऊ लागली आहे. (Maharashtra News)

इस्लामपूरचे भाजप नेते विक्रम पाटील आणि राहुल महाडिक म्हणाले भाजपचे जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी असूनही हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या विरोधात जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी प्रचार केला. त्यांनी राजू शेट्टी यांचा प्रचार केला. यामुळे भाजप विराेधात प्रचार करणाऱ्या निशिकांत भोसले पाटील यांची पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी विक्रम पाटील आणि राहुल महाडिक यांनी केली आहे.

mahayuti leaders demands resignation of nishikant bhosale patil who helps raju shetti in election
MNS Andolan : पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर, मनसैनिकांचा प्रदुषण महामंडळास इशारा; मृत माशांचे केले उत्तरकार्य

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि अन्य घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करून काम केले. मात्र भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धैर्यशील माने यांचा प्रचार न करता राजू शेट्टींचा प्रचार केला असा आराेप महायुतीच्या नेत्यांनी देखील केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, राष्ट्रवादीचे चंद्रशेखर तांदळे, मनसेचे सनी खराडे यांनी संयुक्त रित्या प्रदेश पातळीवर त्याबाबत तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.

Edited By : Siddharth Latkar

mahayuti leaders demands resignation of nishikant bhosale patil who helps raju shetti in election
Success Story: दिव्यांग 'माला' एमपीएससीत चमकली, शंकरबाबांच्या लेकीवर काैतुकाचा वर्षाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com