Uddhav Thackeray Raj Thackeray saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरेंचा जन्म,ठाकरे 'बंधू' एकत्र येणार, सामनामध्ये काय काय म्हटले?

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance Political News : राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या आवाहनावर सामनाच्या अग्रलेखातून प्रतिक्रिया, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

raj thackeray uddhav thackeray alliance : राज ठाकरेंनी एकत्र येण्याची साद घातली, त्याला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या बातमीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. ही महाराष्ट्रद्रोह्यांची दाणादाण उडवणारी ही राजकीय घडामोड आहे. दोन 'बंधू' एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा येऊन ते चिडचिडपणा करू लागले, तर काही जण चेहन्यावर खोटा आनंद आणून "व्वा, छान! दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आनंदच" असे सांगत आहेत, पण महाराष्ट्रद्रोह्यांचा हा आनंद खरा नाही, अशी खरमरीत टीका ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली. आजच्या सामना अग्रलेखातून 'महाराष्ट्राला आणखी काय हवे?' असं म्हणत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे.

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच घडावे. वाद, भांडणे यात उभे आयुष्य गेले तर महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्या माफ करणार नाहीत. भाजपचे राजकारण हे 'वापरा आणि फेका' या वृत्तीचे आहे. मोदी, शहा, फडणवीस हे देशाचे नाहीत, तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? राजकारणात विष पेरण्याचेच काम त्यांनी केले. महाराष्ट्रात कृष्णा-कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा व त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावे ही त्यांची भूमिका नाही. प्रयागराजच्या गढूळ, अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवले व धर्माचा धंदा केला. महाराष्ट्रातील मराठी जनतेने बोध घ्यावा व प्रत्येक पाऊल जपून टाकावे असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे. विषातून अमृत निघाले तर महाराष्ट्राला हवेच आहे, असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरेंचा जन्म

अमित शहा, मोदी, फडणवीस, एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर वार केले. याच शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरे यांचाही जन्म झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या आईशी बेइमानी करणाऱ्यांना पंगतीला बसवून महाराष्ट्र हिताची बात एकत्र येऊन कशी पुढे नेणार? हा साधा सरळ प्रश्न आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे. राज ठाकरे यांचे आतापर्यंतचे राजकारण नागमोडी पद्धतीचेच होते व ते फारसे यशस्वी झाले नाही. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी 'मनसे' या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. त्या वेळी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना लोकांचे बऱ्यापैकी समर्थन मिळाले, पण पुढे त्यांच्या पक्षाला ओहोटी लागली. भारतीय जनता पक्ष, 'एसंशिं' वगैरे लोक 'राज' यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर हल्ले करीत राहिले. यात राज यांच्या पक्षाचा राजकीय लाभ झाला नाही, पण मराठी एकजुटीचे अतोनात नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT