Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकरांसोबत २००८ पासून काम, ईमेलवरुन धमकी अन्..., अटकेतील महिला मनिषा मुसळे-माने कोण?

Solapur Shirish Valsangkar Death Case : सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली. रुग्णालयातील कर्मचारी मनीषा मुसळे-माने हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेय.
Dr Shirish Valsangkar
Solapur Shirish Valsangkar Death CaseSaam Tv
Published On

Solapur Dr Shirish Valsangkar News Update : सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी डोक्यात गोळ्या घालून आयुष्य संपवले. शनिवारी रात्री या आत्महत्या प्रकरणात सोलापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली. डॉक्टरांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रुग्णालयातील कर्मचारी महिला मनीषा मुसळे-माने हिला अटक करण्यात आले. मनीषा माने हिला सदर बझार पोलिसांनी रविवारी कोर्टात हजर केले. न्यायाधीश दीपक कंखरे यांनी मनीषा माने हिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर यांचा मुलगा डॉ. अश्विन वळसंगकर यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यामध्ये मनीषा मुसळे काळे हिच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. सिरीष वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मनीषा माने हिच्यावर कारवाई करण्यात आली. मनीषा माने या सध्या पोलीस कोठडीत आहेत. मनीषा आणि वळसंगकर रूग्णालयाचे जुने नाते आहे. मागील २० वर्षांपासून त्या रूग्णालयात काम करत होत्या. वळसंगकर यांच्या विश्वासू कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती.

Dr Shirish Valsangkar
Shirish Valsangkar : न्युरोसर्जन वळसंगकरानी आयुष्य का संपवले? धक्कादायक कारण समोर

मनीषा काळे या डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी सध्या कार्यकरत होत्या. रूग्णालयात त्या २० वर्षांपासून कार्यरत आहेत. मनीषा ही डॉ. वळसंगकर यांची अत्यंत विश्वासू कर्मचारी होती, पण तिच्यामुळेच आयुष्य संपवल्यामुळे एकच खळबळ उडाली.

Dr Shirish Valsangkar
Dr Shirish Valsangkar : न्युरोसर्जन डॉ. वळसंगकरांनी चिठ्ठीत उल्लेख केलेली महिला समोर, कोर्टात हजर | PHOTOS

मनीषा काळे कोण आहेत?

वळसंगकर रूग्णालयात मनीषा काळे या प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या. मनीषा काळे यांचं बीएएमस शिक्षण झालेय. त्यांचा नवरा नवरा राजकीय पक्षाशी निगडीत आहे. २००८ पासून मनीषा ही वळसंगकर रूग्णालयात काम करत होती. मागील २० वर्षांत घेतलेल्या मेहनीमुळेच ती सध्या प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहात होती. पण सुट्टी घेतल्यानंतर एक दिवसाचा पगार कट झाला अन् रूग्णालयासोबत वाजले.

Dr Shirish Valsangkar
Dr. Shirish Valsangkar : न्यूरोसर्जन वळसंगकरांची सुसाईड नोट समोर, आयुष्य संपवण्याआधी काय लिहिलं, ती महिला कोण? | VIDEO

मनीषा हिच्या वकिलाने केलेल्या दाव्यानुसार, ती सुट्टीवर गेली होती. त्या सुट्टीचा एक दिवसाचा पगार रूग्णालयाकडून कापण्यात आला. त्यानंतर मनीषा आणि रूग्णालयात क्लॅशेस झाले. मनीषाने मेल करत आपली खदखद व्यक्त केली होती. मेल आल्यानंतर मनीषा हिची वळसंगकर यांनी समजूत काढली होती. दरम्यान, वळसंगकर रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी मनीषा हिच्यावर मोठी कारवाईची मागणी केली.त्यासाठी ते पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचे समजतेय.

Dr Shirish Valsangkar
Mumbai-Pune Highway Accident : बोर घाटात भीषण अपघात, ट्रकची ५ वाहनांना धडक, माय-लेकीचा मृत्यू, १२ जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com