Rain Alert in Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

IMD Rain Alert: राज्यात पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस, तब्बल १५ जिल्ह्यांना अलर्ट; वाचा वेदर रिपोर्ट

Maharashtra Rain News : मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासोबत काही भागात गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे.

Satish Daud

अवकाळी पावसाने अख्ख्या महाराष्ट्राला कवेत घेतलंय. उन्हाळ्यातील काही दिवस वगळले तर संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाचा मारा सुरू आहे. पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. अवकाळीचं संकट नेमकं कधी दूर होणार? याची वाट बळीराजा पाहत आहेत. अशातच हवामान खात्याने शनिवार आणि रविवारी पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासोबत काही भागात गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे.

मराठवाडा आणि विदर्भात ताशी ४० ते ५० च्या वेगाने वारे वाहतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज, तर काही भागाला यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेतकऱ्यांनी पिकांची तसेच फळबागांची काळजी घ्यावी असा सल्लाही देण्यात आलाय.

कोणकोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

भारतीय हवामान खात्याने शनिवारी आणि रविवारी पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जळगाव जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

कोणकोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

सोलापूर, सांगली, जालना, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये शनिवार आणि रविवार दोन दिवस तुफान पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यात गारपीट देखील होऊ शकते. या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Vicky Kaushal : विकी कौशलने व्यक्त केली मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा, आवडता दिग्दर्शकही सांगितला

Henna Side Effects : केसांना मेहंदी लावताय? मग थांबा 'हे' नुकसान आधी जाणून घ्या

Original Paithani Saree: गुढीपाडव्याला नेसण्यासाठी ओरिजनल पैठणी साडी कशी ओळखायची?

SCROLL FOR NEXT