Nandurbar News: नंदुरबार शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार; विरचक धरणातील पाणीसाठा घटला

Nandurbar Water Problem News: मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने पाण्याचे संकट राज्यभरात आहे. पाण्याचे संकट दूर करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करत टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
Nandurbar News: नंदुरबार शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार; विरचक धरणातील पाणीसाठा घटला
Water Will Only be Available After Every 4 Days Due To Water Cut in Nandurbar CitySaam TV
Published On

सागर निकवाडे

नंदुरबार : पाणी टंचाईची भीषणता संपूर्ण राज्यात जाणवत आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणी कपातीचे संकट अनेक शहरांवर ओढवले आहे. यात आता नंदुरबार शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या विरचक धरणातील पाणीसाठा घटल्याने नंदुरबार शहरावर देखील पाणी कपातीची टांगती तलवार आहे. आगामी काही दिवसात पाणी कपात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

Nandurbar News: नंदुरबार शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार; विरचक धरणातील पाणीसाठा घटला
Pandharpur Drought : पाणी नसल्याने द्राक्षबाग सुकली; दुष्काळामुळे बाग काढण्याची शेतकऱ्यांवर वेळ

मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने पाण्याचे संकट राज्यभरात आहे. (Water Scarcity) पाण्याचे संकट दूर करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करत टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र काही धरणात पाणी असल्याने आतापर्यंत त्या भागात पाण्याची समस्या जाणविली नाही. मात्र उन्हाची तीव्रता अधिक असल्याने धरणातील पाणी आटत आहे. यामुळे पाणी संकट निर्माण झाले आहे. नंदुरबार (Nandurbar) शहरात देखील पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. 

Nandurbar News: नंदुरबार शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार; विरचक धरणातील पाणीसाठा घटला
Jamner Crime : नशेत मुलाने केला पित्याचा खून; दारूसाठी पैसे देण्यास वडिलांनी नकार दिल्याने कृत्य

धरणात २० टक्केच पाणी

नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत असून नंदुरबारकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे. यातच नंदुरबार शहराला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या वीरचक धरणात अवघ्या २० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. उपाययोजना म्हणून नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने नंदुरबार शहराला ४ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केलं असून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आव्हान देखील नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com