Bhandara News: पिकविम्यात शेतकऱ्यांची थट्टा! नुकसान भरपाई म्हणून मिळाले १०००, १२०० रुपये; बळीराजाचा संताप

Bhandara Crop Insurance: भंडारा जिल्ह्यात पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. कोणाला १ हजार तर कोणाला १५०० रुपये विमा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.
Bhandara News: पिक विम्यात शेतकऱ्यांची थट्टा! नुकसान भरपाई म्हणून मिळाले १०००, १२०० रुपये; बळीराजाचा संताप
Crop InsuranceSaam tv

शुभम देशमुख, ता. १७ मे २०२४

अवकाळी पाऊस, अस्मानी संकटाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. अशावेळी सरकारकडून मिळणाऱ्या पीकविम्यातही बळीराजाच्या तोंडाला पाणे पुसल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यात पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. कोणाला १ हजार तर कोणाला 1500 रुपये विमा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.

दरवर्षी शेतात लावलेल्या पिकांचे अस्मानी संकटामुळे नुकसान होते. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना मदत होईल या उद्देशाने सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू केली. शेतकऱ्यांनी मोठं मोठ्या रांगा लावुन विमा काढला. 2023 - 24 मध्ये खरीप हंगामात अतिवृष्टी झाली. त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे धान्य पिक पाण्याखाली गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणत शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारने चोलामण्डल कंपनीकडे ऑनलाईन नोंदणी करण्यास सांगितले. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असा शेतकऱ्यांनी नोंदणी केली. पण आता याच नुकसानीचे पंचनामे झाले. आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणे सुरू झाले असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे.

Bhandara News: पिक विम्यात शेतकऱ्यांची थट्टा! नुकसान भरपाई म्हणून मिळाले १०००, १२०० रुपये; बळीराजाचा संताप
Sunil Tatkare: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ महायुतीत नाराज? सुनिल तटकरेंनी केला महत्वाचा खुलासा; म्हणाले...

दरम्यान, एकीकडे खताची बॅग आज घडीला १३०० रुपयाला मिळत असताना देखील नुकसान भरपाई मात्र १००० रुपये शेतकऱ्यांना दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची थट्टा सरकार करत असल्याचे आरोप केला जात आहे. या प्रकरणावरुन कंपनीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Bhandara News: पिक विम्यात शेतकऱ्यांची थट्टा! नुकसान भरपाई म्हणून मिळाले १०००, १२०० रुपये; बळीराजाचा संताप
Sunil Tatkare: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ महायुतीत नाराज? सुनिल तटकरेंनी केला महत्वाचा खुलासा; म्हणाले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com