rain hits nanded police bharti postponed know the details
rain hits nanded police bharti postponed know the details Saam Digital
महाराष्ट्र

Police Bharti: नांदेड, अमरावती ग्रामीण पाेलिस भरतीची प्रक्रिया स्थगित, जाणून घ्या कारण

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी / अमर घटारे

नांदेड येथे गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पाेलिस कवायत माेठ्या प्रमाणात मैदानावर चिखल साचला. परिणामी आज (शुक्रवार, ता. 21 जून) हाेणारी पाेलिस भरतीची प्रक्रिया स्थगित केल्याची माहिती नांदेड जिल्हा पाेलिस दलाने दिली.

नांदेड जिल्ह्यात गेल्या दाेन दिवसांपासून पाेलिस भरतीची प्रक्रिया सुरु झाली. नांदेड येथे 134 जागांसाठी भरती प्रक्रिया गुरुवारपर्यंत सुरु हाेती. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे आज (शुक्रवार) मैदानावर चिखल झाल्याचे चित्र हाेते. नांदेड पोलिस प्रशासनाने मैदानाची पाहणी केली.

त्यानंतर आजची भरती प्रक्रिया स्थगित केली. नांदेड पोलिस प्रशासनाने त्याबाबत सूचना फलकावर त्याची माहिती प्रसिद्ध केली. यामध्ये आज (21 जून) होणारी उमेदवारांची शारीरिक चाचणी पोलिस परेड मैदानावर पाणी साचल्याने व पर्यायी मैदान उपलब्ध नसल्याने पुढे ढकलण्यात आलेली आहे. संबंधित उमेदवारांना पुढील तारीख त्यांचे ईमेल आयडीवर कळविण्यात येईल असे नमूद करण्यात आले हाेते.

अमरावती ग्रामीण पाेलिस भरती स्थगित

अमरावती ग्रामीण पोलिसांची भरती स्थगित करण्यात आली आहे. मैदानात पावसामुळे चिखल साचला होता. त्यामुळे पाेलिस दलाने भरती प्रक्रिया स्थगित ठेवली. उमेदवारांना पुढील तारीख लवकरच कळवली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान अमरावती शहर पोलिसांची भरती प्रक्रिया पूर्ववत सुरु असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : पुरात अडकलेल्या 56 नागरिकांना राजापूर पोलिसांनी वाचवले

Amravati News: संतापजनक! अमरावतीत १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, ४ आरोपींना अटक

Mumbai Rain Alert: मुंबईत पावसाची दमदार बँटिंग; अनेक ठिकाणी साचले पाणी; पाहा PHOTO

Sambhajinagar News : मोठी बातमी! शिवसेना गटातील आमदाराच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक; राजकीय वर्तुळात खळबळ

Latur Accident News: हृदयद्रावक घटना! भरधाव कारने दुचाकीला उडवले, पतीचा जागीच मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT