ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता इतरांना आरक्षण द्यावं, नांदेड सकल ओबीसी समाजाचा लक्ष्मण हाकेंना पाठिंबा

nanded obc community supports laxman hake : राज्यभरातून ओबीसी समाज लक्ष्मण हाके यांच्या आंदाेलनाला पाठींबा देऊ लागले आहेत. विविध जिल्ह्यात जिल्हाधिका-यांना निवेदन दिले जात आहे.
nanded obc community supports laxman hake
nanded obc community supports laxman hakeSaam Digital

- संजय सूर्यवंशी

ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता इतरांना आरक्षण द्यावं, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा नांदेड येथील सकल ओबीसी समाजाने निवेदनाद्वारे सरकारला दिला आहे. ओबीसी समाज देखील आपली ताकद सरकारला दाखवेल असा इशारा ओबीसी नेते अविनाश भोसीकर यांना दिला आहे.

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना नांदेड मधून देखील ओबीसी बांधवांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी बेमुदत उपाेषण सुरू केले आहे.

nanded obc community supports laxman hake
Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal : नरेंद्र पाटलांच्या आक्रमकतेमुळे 'त्या' 61 कर्मचा-यांना मिळाला दिलासा, मराठा समाजासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश (पाहा व्हिडिओ)

या आंदोलनाला मराठवाड्यातुन मोठा पाठिंबा मिळतोय. नांदेड मध्ये देखील ओबीसी बांधव यांनी हाके यांना पाठिंबा देत जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केले. सकल ओबीसी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकत्र येत घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देखील देण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

nanded obc community supports laxman hake
काँग्रेस खासदाराच्या भावाची अधिका-यास शिवीगाळ, मारहाणीच्या घटनेने उडाला गाेंधळ (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com