Maharashtra Today Weather News Saam Tv
महाराष्ट्र

Rain Alert: पुन्हा पाऊस धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Today Weather News: दडी मारलेला पाऊस पुन्हा आगमन करणार आहे. महाराष्ट्रासह १७ राज्यांना हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Priya More
  • महाराष्ट्रात दडी मारलेला पाऊस पुन्हा येणार

  • काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

  • हवामान खात्याकडून महाराष्ट्रासह १७ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

  • वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता

जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला. अवघ्या सहा दिवसांत पडलेल्या पावसाने जूनची कसर भरून काढली. पण त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे. आणखी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत सर्वजण आहेत. पण पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. तर दुसरीडे उकाडा वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशामध्ये हवामान खात्याने महत्वाची अपडेट दिली. मान्सूने संपू्र्ण देश व्यापला आहे. आज १७ राज्यांमध्ये हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या सर्व राज्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळेल.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज देशातील १७ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसह देशातील १७ राज्यात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळेल. यामध्ये महाराष्ट्र. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आसाम या सर्व राज्यांचा समावेश आहे. या सर्व राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे. या काळामध्ये प्रति तास ८० ते ८५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

१७ राज्यांना हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रात पावसाने उघडीप घेतली असली तरी देखील काही जिल्ह्यांना पाऊस झोडपण्याची शक्यता आहे. आज राज्यात पुन्हा पाऊस जोर पकडू शकतो. मराठवडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर धुळे, नंदुरबार, रत्नागिरी आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे आज महाराष्ट्रात ऊन सावल्यांचा खेळ पाहायला मिळेल. पावसाने दडी मारल्यामुळे ऊन्हाचे चटके तीव्र होत चालले आहेत. राज्यातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. राज्यात आज पावसाची उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आज अनेक ठिकाणी तापमान जास्त असेल आणि उन्हाचे चटके जाणवतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT