Shreya Maskar
गागरोन किल्ला राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात, झालावाड शहराजवळ आहे. तो विंध्य पर्वतरांगेच्या खालच्या उंचीच्या भागात वसलेला आहे. हा एक प्रसिद्ध जलदुर्ग आणि डोंगरी किल्ला आहे.
आहू आणि काली सिंध या नद्यांच्या संगमाजवळ असल्यामुळे त्याला नैसर्गिक संरक्षण लाभले आहे. किल्ल्याच्या तीन बाजूंना पाण्याचे संरक्षण आणि एका बाजूला डोंगराळ भूभाग असल्यामुळे शत्रूला किल्ल्यापर्यंत पोहोचणे कठीण होत असे.
ऐतिहासिक दस्तऐवजानुसार, या किल्ल्याची वास्तुशैली १२व्या शतकातील डोडा आणि खिंची राजपूतांच्या लष्करी स्थापत्याशी संबंधित आहे.
राजस्थानमध्ये उन्हाळ्यात तापमान खूप वाढू शकते. त्यामुळे ऑक्टोबर ते मार्च हा काळ साधारणपणे किल्ला पाहण्यासाठी अधिक सोयीचा मानता येतो, हवामान तुलनेने थंड असते.
किल्ल्याभोवती मजबूत दगडी तटबंदी आणि संरक्षक भिंती आहेत. शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बुरुजांची उभारणी करण्यात आली. किल्ल्याच्या प्रवेशभागात कमानीची रचना दिसते.किल्ल्याच्या उंच भागावर छत्रीची रचना आढळते.
राजपूत लष्करी स्थापत्यकला, मध्ययुगीन युद्धे आणि व्यापारी मार्गांवरील नियंत्रणाचा इतिहास प्रसिद्ध आहे.
गागरोन किल्ल्याच्या जवळ झालावाड हे रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही स्टेशनला उतरून पुढे रिक्षा, पब्लिक ट्रान्सपोर्टने जाऊ शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.