Oil Price Crash : कच्च्या तेलाचे दर घसरले, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार की महागणार? जाणून घ्या

Crude Oil Price Crash : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 16 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड 97 डॉलरवर आले असतानाही भारतात पेट्रोल-डिझेलचे दर कायम आहेत. ग्राहकांना स्वस्त इंधनाचा फायदा कधी मिळणार?
Oil Rates Falls News
Oil Rates Falls NewsAI Image
Published On: 
Summary
  • गेल्या आठवड्यात ब्रेंट क्रूडच्या किमतीत मोठी घसरण झाली

  • आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल 97 डॉलरवर पोहोचला.

  • अमेरिकन कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी घसरण

  • दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्याच्या शक्यतेमुळे तेल बाजारावर दबाव

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण सुरू आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने तेलाच्या दरांवर दबाव आला आहे. गेल्या आठवड्यात ब्रेंट क्रूडच्या किमतीत 16 टक्क्यांहून अधिक घट झाली. एप्रिल 2020 नंतरची ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरण मानली जात आहे. सोमवारी ब्रेंट क्रूडचा दर 97 डॉलर प्रति बॅरल, तर अमेरिकन WTI क्रूडचा दर 90 डॉलरच्या आसपास होता. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात तेल स्वस्त होत असले तरी भारतीय ग्राहकांना त्याचा फायदा अद्याप मिळालेला नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर 102.12 रुपये, तर डिझेलचा दर 95.20 रुपये प्रति लिटर आहे. दिवाळीनंतरही या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष कमी होण्याची शक्यता बाजारात व्यक्त केली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेतून मार्ग निघाल्यास इराणवरील पुढील हल्ल्याची शक्यता कमी असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत राहील, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. मात्र, पश्चिम आशियातील परिस्थिती अजूनही पूर्णपणे शांत झालेली नाही. होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहू जहाजावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

Oil Rates Falls News
Married Life Tips : पती-पत्नीमध्ये किती वयाचे अंतर असावे? यशस्वी आणि सुखी संसाराचं गणित समजून घ्या

याशिवाय येमेनमधील हूती बंडखोरांनी सौदी अरेबियातील तेल कंपन्यांना लक्ष्य केले. त्यामुळे तेलाच्या पुरवठ्याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या म्हणजे लगेच पेट्रोल-डिझेल स्वस्त होईल, असे नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनेक व्यवहार हे भविष्यात तेलाचा पुरवठा मिळण्यासाठी केलेले असतात. त्यामुळे त्याचा परिणाम लगेच दिसत नाही.

Oil Rates Falls News
Sleep Health : ६ तासांची झोप पुरेशी आहे का? वयानुसार किती झोप आवश्यक

दुसरीकडे, सरकारी तेल कंपन्या आधी झालेला आर्थिक तोटा भरून काढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कच्चे तेल स्वस्त झाले तरी पेट्रोल-डिझेलचे दर तातडीने कमी केले जात नाहीत. मे 2026 मध्ये सरकारी तेल कंपन्यांनी चार टप्प्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एकूण 7.50 रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा फायदा सामान्य ग्राहकांना कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.