raghunath dada patil address media in chhatrapati sambhajinagar saam tv
महाराष्ट्र

Raghunathdada Patil News : कायदा नव्हे केवळ बियाणे कंपन्याकडून पैसे उकळण्याचा सरकारचा उद्देश : रघुनाथदादा पाटील

छत्रपती संभाजीनगर येथे बियाणे कायद्यासंदर्भात रघुनाथदादा पाटील यांनी सरकरावर टीका केली.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhaji Nagar News :

राज्यातील बियाणे उत्पादन कंपन्यांकडून खंडणी उकळण्यासाठी राज्य शासनाकडून कृषी बियाणे उत्पादक आणि विक्रेते यांच्यासाठी जाचक अटी असलेला कायदा आणला जात आहे असा आरोप शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील (raghunathdada patil latest marathi news) यांनी केला. छत्रपती संभाजीनगर येथे बियाणे कायद्यासंदर्भात आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रघुनाथदादा पाटील यांनी सरकराला काही सूचना केल्या. (Maharashtra News)

रघुनाथदादा पाटील म्हणाले कृषी बियाणे उत्पादन, विक्री करणा-या विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासनाकडून नवीन कायदे तयार करणेची प्रक्रिया सुरु आहे. सध्या प्रचलीत असलेल कायदे पुरेसे असतानाही किंवा प्रस्तावित नवीन कायदे करणेबाबत शेतकरी, शेतकरी संघटना, उत्पादक, विक्रेते किंवा त्यांच्या संघटना यांची मागणी नसतानाही सरकार केवळ बियाणे कंपन्यांना त्रास देण्यासाठी हे कायदे आणू पाहत आहे असेही पाटील यांनी नमूद केले.

ते म्हणाले त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसणार आहे. त्यामुळे प्रस्तावित नवीन कायदे करण्यापूर्वी या नवीन कायद्याची वस्तुनिष्ठता सरकारने सगळ्यांसमोर मांडावी अशी मागणी देखील पाटील यांनी केली. यावेळी जगन्नाथ काळे, रामचंद्र नाके, कालिदास आपेट, निलेश बारगळ आदी उपस्थित हाेते.

दरम्यान सरकारचा उद्देश हा केवळ बियाणे कंपन्याकडून पैसे उकळण्याचा आहे असा थेट आरोप देखील रघुनाथदादा पाटील यांनी केला. यावेळी बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, वितरक पदाधिकारी आदी उपस्थित हाेते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT