Soybean Price Hike: सोयाबीनच्या दराने खाल्ली उचल, शेतक-यांत समाधान

काही प्रमाणात भाव वाढत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी समाधानी दिसू लागलेत.
soyabean price hike in parbhani and yavatmal
soyabean price hike in parbhani and yavatmalSaam tv
Published On

Parbhani News :

साेयाबीनच्या दरात हळूहळू हजार रुपयांची वाढ हाेऊ लागल्याने परभणीसह यवतमाळ जिल्ह्यातील साेयाबीन उत्पादक शेतक-यांना थाेडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान सोयाबीनला प्रति क्विंटल 9 हजार रुपयांचा भाव द्या अशी मागणी लातूर जिल्ह्यातून व्यक्त हाेऊ लागली आहे. (Maharashtra News)

soyabean price hike in parbhani and yavatmal
Bhaubeej 2023 : 'स्वाभिमानी'च्या महिला आघाडीची मंत्री हसन मुश्रीफांना खर्डा भाकरीची ओवाळणी

परभणी जिल्ह्यात गेल्या वर्षी प्रति क्विंटल दहा हजार रुपयांवर गेलेले सोयाबीन आज ह्या खरिपातील सोयाबीनला परभणी, मानवत व सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात 5100 ते 5250 रुपये प्रति क्विंटल दराने विकले जात आहे.

आठ दिवसांपूर्वी सोयाबीनला 4200 प्रति क्विंटल भाव होता. तो 1000 रुपयांपर्यंत वाढला आहे. यावर्षी पावसाने मोठा खंड दिल्याने व रोग पडल्याने सोयाबीनचे उत्पादन अर्ध्यावर आले आहे. आता काही प्रमाणात भाव वाढत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी समाधानी आहे.

यवतमाळला सोयाबीनचा दर वधारला

यवतमाळच्या खुल्या बाजारात सोयाबीन ढेप आणि तेलाच्या किमतीत काही प्रमाणात वाढ नोंदविण्यात आली याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला आहे. सोयाबीनच्या दरामध्ये क्विंटलामागे दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. बाजार समित्या बंद असताना सोयाबीन प्लान्टचे दर पाच हजार दोनशे वर पोचले असून खुल्या बाजारात 5200 ते 5400 प्रतिक्विंटल दर मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

सोयाबीनला प्रतीक्विंटल 9 हजार रुपयांचा भाव द्या

लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी शेतकरी नेते सत्तार पटेल यांनी नुकतीच केली आहे. यंदा शेतकऱ्यांची "दिवाळी नसून दिवाळ निघाल आहे". त्यामुळे तात्काळ शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी तसेच साेयाबीनला प्रतिक्विंटल नऊ हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी करण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोयाबीनसह ऊसाला अज्ञातांनी लावली आग

बीडच्या वडवणी तालुक्यातील धानोरा शिवरात असणाऱ्या सोयाबीनसह ऊसाला अज्ञात व्यक्तींनी आग लावली. यामध्ये गावातील सख्खे भाऊ असणाऱ्या खांडवे बंधू मधील अंगद खांडवे यांची 6 एक्कर सोयाबीन तर भाऊ भगवान खांडवे यांचा अडीच एकर ऊस जळून खाक झाली आहे. ही घटना रात्री 10 च्या दरम्यान घडली. यामध्ये खांडवे बंधूंचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

soyabean price hike in parbhani and yavatmal
Raju Shetti : साखर कारखानदारांची आज स्वाभिमानी समवेत महत्वपूर्ण बैठक, बोलणी फिस्कटल्यास... राजू शेट्टींचा गंभीर इशारा (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com