- रणजीत माजगावकर
ऊस उत्पादक शेतक-यांना न्याय द्यावा या मागणीसाठी आज (बुधवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीने कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (hasan mushriff) यांना भाऊबीज (bhaubeej 2023) निमित्त खर्डा भाकरी देवून ओवाळणी केली. या अऩाेख्या आंदाेलनाची चर्चा काेल्हापूरात सुरु आहे. (Maharashtra News)
मागील वर्षी तुटलेल्या उसाला चारशे रुपये दुसरा हप्ता द्यावा. तसेच यंदा 3500 रुपये उसाला दर मिळावा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी आहे. या मागणीच्या पुर्तेतेसाठी संघटना राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांपासून साखर कारखान्यांच्या दारात आंदाेलन करीत आहे.
या आंदाेलनात आता स्वाभिमानीची महिला आघाडी देखील उतरली आहे. सरकार आणि कारखानदारांनी शेतक-यांना वा-यावर सोडले आहे. या आंदोलनात तोडगा न काढल्याने आणि शेतक-यांची दिवाळी रस्त्यावर गेली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यामुळे दिपावली भाऊबीज निमित्त स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने आमदार, खासदार लोकप्रतिनिधींना खर्डा भाकरी देवून ओवाळणी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना कागल (kagal) तालुक्यातील महिलांनी खर्डा भाकरी देवून ओवाळणी केली. यावेळी मुश्रीफ यांनी महिला आघाडीशी चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासित केले.
दरम्यान हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे आज राजू शेट्टी हे आंदाेलनाची पुढची दिशा निश्चित करणार आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.