Vaishnavi Hagawane case Saam Tv News
महाराष्ट्र

Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला, धक्कादायक माहिती उघड; विचारही केला नसेल इतकं भयंकर

Vaishnavi Hagawane Death Case: पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. पोस्टमॉर्टम अहवालानुसार, वैष्णवीच्या शरीरावर २९ जखमा आढळल्या असून, त्यातील ५ ते ६ जखमा ताज्या आहेत.

Bhagyashree Kamble

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. पोस्टमॉर्टम अहवालानुसार, वैष्णवीच्या शरीरावर २९ जखमा आढळल्या असून, त्यातील ५ ते ६ जखमा ताज्या आहेत. या अहवालामुळे तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. वैष्णवी हगवणेसोबत १६ मे आधी नेमकं काय घडलं होतं? आत्महत्या होती की हत्या? याचं संपूर्ण गूढ पोलीस आपल्या तपासातून उघड करणार आहेत.

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे २९ व्रण असून, त्यातील ५ ते ६ व्रण ताजे आहेत. हा अहवाल समोर येताच वैष्णवीची हत्या झाली की तिने आत्महत्या केली, हा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अहवालात वैष्णवीला आत्महत्येच्या दिवशीही सासरच्या कुटुंबीयांकडून छळ करण्यात आला असल्याचे नमूद केले आहे.

पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टनुसार, हगवणे कुटुंबीयांचे सर्व बँक खाते पोलिसांनी गोठवले आहेत. वैष्णवीचे सोने गहाण ठेवून त्यातून मिळालेल्या रकमेचा वापर कसा झाला, याचा तपास सुरू आहे. फरार आरोपी निलेश चव्हाण याचा हगवणे कुटुंबीयांशी असलेला संबंध तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे, अशी माहिती समोर आली आहे.

पोलिसांना हगवणे कुटुंबीयांची एकत्र चौकशी करायची आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीच्या सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली आहे. त्यांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत निलेश सांबरे हे विजयी

cabinet reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठा भूकंप! नितीन गडकरींचे खाते बदलणार? काय आहे मोदींचा मेगा प्लॅन, जाणून घ्या...

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आरतीच्या थाटात 'या' 5 वस्तू असायलाच हव्यात

Bus Accident News : भीषण अपघात! मुंबईतून पर्यटनासाठी राजगडावर निघालेल्या पर्यटकांची बस दरीत कोसळली; २ जणांचा मृत्यू

Shocking : खळबळजनक! प्रेमसंबंधात पतीचा अडथळा, बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने काढला काटा

SCROLL FOR NEXT