Marathi Industry: 'तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा..'अभिनेत्याचे प्रायव्हेट चॅट व्हायरल, स्क्रीनशॉट शेअर करत अभिनेत्रीकडून पोलखोल

Marathi Actress Shares Screenshots: प्रसिद्ध मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री प्राची पिसाट हिने ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हाशिलकर यांच्यावर अश्लील मेसेज पाठवल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्राचीने सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट्स शेअर करून हे प्रकरण उघड केले आहे.
Marathi Actress
Marathi ActressSaam
Published On

बॉलिवूडमध्ये सहकलाकारांसोबत अश्लील वर्तनाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बऱ्याचदा चॅट्स देखील व्हायरल होतात. असाच एक प्रकार मराठी सिनेसृष्टीतून समोर येत आहे. मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री प्राची पिसाट हिनं ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशिलकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुदेश यांनी प्राचीला मेसेंजरवर अश्लील मेसेज पाठवले आहेत. प्राचीने सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट्स शेअर करून हे प्रकरण उघड केलंय. स्क्रीनशॉट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

सुदेश यांनी प्राचीला फेसबुक मेसेंजरवर मेसेज पाठवला आहे. सुदेश यांनी, 'खूपच सेक्सी दिसायला लागलीयेस हल्ली... वाह.' असे लिहिले आहे. तर, दुसऱ्या मेसेजमध्ये "तुझा नंबर पाठव ना... तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये... कसली गोड दिसतेस" असे म्हटले आहे. या मेसेजता स्क्रीनशॉट प्राचीने आपल्या समाजमाध्यमांवर शेअर केला. स्क्रीनशॉट शेअर करत प्राचीने लिहिले की, आणि मला हा स्क्रीनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली.. बायकोचा नंबर असलेच... तीही गोड आहे.. बघ तिच्याशी फ्लर्ट करायला जमते का..".

Marathi Actress
Shocking Crime: 'मासे कुत्र्याने का खाल्ले?' मुलाचं डोकं सटकलं, लाकडी काठीनं मारत आईचा घेतला जीव

तिने पुढील पोस्टमध्ये लिहिलं की, 'ही पोस्ट शेअर केल्यानंतर मला पोस्टी डिलीट करून तोंड बंद करण्यासाठी माझ्यावर प्रेशर टाकण्यात आला. पण मला असं वाटतं ही पोस्ट माझ्या इन्स्टाग्रामवर असणं डिझर्व करत आहे. चला तर मग विषय संपवूया. जोवर सुदेश म्हशीलकर माझी गोड माफी मागत नाहीत. माझा नंबर वन नाही, एफबीवर आहे. चेक क्रॉस चेक-रिचेक-इट्स नॉट द हॅकर', असं तिनं पोस्ट केलं आहे.

Marathi Actress
Highway Video: नेत्याचा हायवेवरील शरीरसंबंधाचा १ मिनिटाचा VIDEO समोर; अभिनेत्याचं ट्वीट, 'ती' निर्वस्त्र महिला कोण?

प्राचीने पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियात नेटकऱ्यांकडून संतापाची लाट उसळली आहे. एका नेटकऱ्याने सुदेश म्हशीलकरांचा अकांऊट हॅक झाले असावे, असं कमेंट करत समर्थन दर्शवले आहे. तर, आणखी एका नेटकऱ्याने, प्राचीला सल्ला दिला आहे, 'तू पोलिसांत तक्रार दाखल कर, तेच सांगतील सुदेश यांचं अकाऊंट हॅक झालं आहे, की त्यांनी स्वत: कमेंट केली आहे'.

Marathi Actress
Beed Crime: बीडमध्ये सरपंचाची गुंडगिरी, महिला- पुरूषांना काळं निळं होईपर्यंत मारलं, दगडफेक करत..

दरम्यान, अभिनेत्रीने हा प्रकार उघडकीस आणल्यामुळे वरिष्ठ कलाकारांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अद्याप सुदेश म्हाशिलकर यांच्याकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com