Shocking Crime: 'मासे कुत्र्याने का खाल्ले?' मुलाचं डोकं सटकलं, लाकडी काठीनं मारत आईचा घेतला जीव

Mother Killed by Son in Dhule: केवळ मासे कुत्र्याने खाल्ल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका २५ वर्षीय तरुणाने आपल्याच सख्ख्या आईचा लाकडी दांडक्याने मारहाण करत जीव घेतला आहे.
Dhule Crime
Dhule CrimeSaam
Published On

माय - लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना धुळ्यातून समोर येत आहे. केवळ मासे कुत्र्याने खाल्ल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका २५ वर्षीय तरुणाने आपल्याच सख्ख्या आईचा लाकडी दांडक्याने मारहाण करत जीव घेतला आहे. तसेच जीव घेतल्यानंतर मुलाने घटनास्थळावरून पलायन केलं आहे. पोलिसांना याची माहिती देण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ही संतापजक घटना धुळ्यातील शिरपूरच्या थाळनेर येथील वाठोडे गावात घडली. टिपाबाई रेबला पावरा (वय वर्ष ६७) असे मृत महिलेचे नाव आहे. तर आवलेस रेबला पावरा (वय वर्ष २५) असे नराधम मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मृत महिलेनं घरात जेवणाला मासे तयार केले होते. मासे कुत्र्याने खाल्ले.

Dhule Crime
Maharashtra Politics: राज-उद्धव एकत्र येणार का नाही? संजय राऊतांकडून पुन्हा एकदा मोठं वक्तव्य

याच कारणामुळे तरूणाला संताप अनावर झाला. त्याने थेट आईवर लाकडी काठीने हल्ला केला. लाकडी काठीने मारहाण केल्यामुळे त्या रक्तबंबाळ होऊन जागेवर बेशुद्ध होऊन कोसळल्या. या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Dhule Crime
Vaishnavi Hagawane: 'त्यांनी असं कृत्य केलं..'; राजेंद्र-सुशील हगवणे लपून बसले 'त्या' फॉर्महाऊस मालकाचा धक्कादायक खुलासा

आईची हत्या केल्यानंतर मुलाने घटनास्थळावरून पळ काढला. परिसरातील नागरिकांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पसार झाल्यामुळे त्याचा शोध घेण्यात येत आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे आणि शोककळा पसरलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com