Maharashtra Politics: राज-उद्धव एकत्र येणार का नाही? संजय राऊतांकडून पुन्हा एकदा मोठं वक्तव्य

Sanjay Raut on Thackeray Brothers: ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर संभ्रम निर्माण झालेला असताना खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra Politics
Raj Thackeray vs Uddhav Thackeray saam Tv
Published On

ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर संभ्रम निर्माण झालेला असताना खासदार संजय राऊतांनी लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका घेतली असून, "योग्य वेळ आल्यावर याबाबतचं चित्र स्पष्ट होईल," असे संकेत संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिले आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्यावर संजय राऊतांनी मनसे प्रतिक्रिया देत चेंडू राज ठाकरेंकडे टोलवला आहे. आता राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार, याकडे मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेय.

संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीबाबत प्रतिक्रिया दिली. 'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकत्र येण्यासंदर्भात सकारात्मक हालचाली सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून योग्य वेळी चित्र स्पष्ट होईल', असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

तसेच, 'ठाकरे बंधूंचा एकत्र येण्याचा निर्णय हा व्यापार किंवा व्यवहार नसून तो मराठी स्वाभिमानाचा प्रश्न आहे. मराठी माणसं एकत्र आली, तर दिल्लीत बसलेल्या ‘गुजराती व्यापाराच्या छाताडावर’ बसून बाळासाहेब ठाकरेंना खरी मानवंदना देता येईल', असंही राऊत म्हणाले.

Maharashtra Politics
Vaishnavi Hagawane Case: हगवणे कुटुंबाला पोलिसांकडून वाचवलं जातंय? IG सुपेकरांकडून स्पष्टीकरण

संजय राऊतांनी यावेळी भाजपवर आरोपी करत हल्लाबोल केला आहे, 'मुंबई ही मराठी माणसाचे हृदय असून ती मराठी माणसाच्या हातात राहू नये, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. अमित शहा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे मुंबई ‘गिळण्याचे’ काम करत आहेत. मराठी जनतेने आता एकत्र येऊन या प्रयत्नांना रोखले पाहिजे', असं राऊत म्हणाले.

Maharashtra Politics
Vaishnavi Hagawane: 'त्यांनी असं कृत्य केलं..'; राजेंद्र-सुशील हगवणे लपून बसले 'त्या' फॉर्महाऊस मालकाचा धक्कादायक खुलासा

नुकतंच छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं आहे, यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत भुजबळांवर टीकेची तोफ डागली, 'छगन भुजबळ सध्या ज्या पक्षात आहेत, तो पक्ष मुळात त्यांचा नाही. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना हे जोडलेले पक्ष असून या पक्षांचे प्रमुख अमित शहा आहेत. भुजबळांनी मंत्रीपदाबाबत बोलताना नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले, मात्र अजित पवारांचे नाव टाळले. भाजपशी जवळीक साधणारे नेते कितीही ताकदवान असले तरी शेवटी ते ‘सरपटणारे प्राणी’ ठरतात', असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com