Vaishnavi Hagawane Case: हगवणे कुटुंबाला पोलिसांकडून वाचवलं जातंय? IG सुपेकरांकडून स्पष्टीकरण

Jalandar Supekar on Vaishnavi Hagawane case: एकीकडे वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांकडून कसून तपास सुरू असताना, दुसरीकडे पोलिस यंत्रणेवरच संशयाची सुई फिरू लागली आहे.
Hagawane
HagawaneSaam
Published On

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून धडक कारवाई सुरू असून, आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकीकडे पोलिसांकडून कसून तपास सुरू असताना, दुसरीकडे पोलिस यंत्रणेवरच संशयाची सुई फिरू लागली आहे. "पोलिस हगवणे कुटुंबाला वाचवत आहेत का?" असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी IG जालिंदर सुपेकर यांची ऑडिओ क्लिप ऐकवत अनेक घक्कादायक खुलासे केले आहेत. हगवणे कुटुंबावर जालिंदरचा पाठिंबा असल्याचं त्यांनी दावा केला. यावर आता कारागृह सेवा सुधार विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी प्रतिक्रिया देत आपली बाजू स्पष्ट केली.

हगवणे कुटुंबाने केलेल्या कृत्याबाबत निषेध व्यक्त करत जालिंदर म्हणाले, "मागील दोन वर्षांपासून माझी नियुक्ती प्रतिनियुक्तीवर तुरुंग विभागात झालेली आहे. त्यामुळे कार्यकारी पोलिस दलातील कोणताही घटक माझ्या अधिपत्याखाली नाही. अशा परिस्थितीत मी कोणालाही सूचना देण्याच्या स्थितीतच नाही. हगवणे कुटुंबाबाबत मी कोणत्याही प्रकारची सूचना दिलेली नाही. उलट, त्यांनी केलेल्या कृत्याचा मी याआधीही निषेध व्यक्त केला आहे," असे जालिंदर यांनी स्पष्ट केलं.

Hagawane
Nashik: आणखी एक वैष्णवी! सासरच्यांकडून मानसिक अन् शारीरिक छळ; शेवटी विवाहितेने घरातच गळफास घेत..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबीयांना मदत केल्याचा आरोप सुपेकर यांच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार, शस्त्र परवाना देण्यातील अनियमितता, तसेच पोलिस निरीक्षकाच्या आत्महत्येशी संबंधित आरोप करण्यात आले आहेत.

Hagawane
Shocking: हायवेवरच कार थांबवून महिलेशी शरीरसंबंध, व्हिडिओ झाला लीक; आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित

यावर स्पष्टीकरण देताना सुपेकर म्हणाले, "पोलिस निरीक्षक आत्महत्या प्रकरणात आमचा कोणताही दोष नाही, हे न्यायालयात सिद्ध झाले आहे." ते पुढे म्हणाले, "तुरुंग विभागातील खरेदी ही सुमारे ३५० कोटी रुपयांची असून, त्यात ५०० कोटींचा गैरव्यवहार शक्यच नाही. ही खरेदी राज्य शासनाने नेमलेल्या खरेदी समितीमार्फत होते आणि मी त्या समितीचा केवळ एक सदस्य आहे", असं त्यांनी सांगितलं.

Hagawane
Vaishnavi Hagawane: निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती; पत्नीसोबतचे बेडरूममधील खासगी क्षण अन् इतर महिलांचे VIDEO

"शस्त्र परवाना देण्याचा अधिकार हा संबंधित पोलिस आयुक्तांकडे असतो. त्याआधी त्या अर्जावर स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सकारात्मक किंवा नकारात्मक अहवाल तयार करून तो अहवाल पोलिस उपायुक्तांकडे पाठवतात," असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com